शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

दोन पाकिस्तान्यांसह 6 अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 5:57 AM

Jammu Kashmir : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम व अनंतनागच्या विशिष्ट भागांत काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस व सुरक्षा दलांना मिळाली होती.

- सुरेश डुग्गर

जम्मू :  काश्मीर खोऱ्यातील कुलगाम व अनंतनाग जिल्ह्यांत एकाच वेळी कारवाई करून सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांना एकाच वेळी कंठस्नान घातले आहे. या सहापैकी दोन दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते, हे उघड झाले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. 

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम व अनंतनागच्या विशिष्ट भागांत काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस व सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी हे दहशतवादी लपलेल्या भागाला घेरून  ठेवले होते. तसेच स्थानिकांना घरांतून बाहेर पडण्यास मज्जाव केला होता. अतिरेक्यांचा प्रत्यक्ष शोध सुरू होताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. 

पोलीस महानिरीक्षक म्हणाले...काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले की, हे सहाहीजण जैश ए महंमद या संघटनेचे होते. या सहापैकी चारजणांची ओळख पटली असून, त्यांतील दोघे पाकिस्तानी आहेत, तर दोघेजण स्थानिक रहिवासी आहेत. अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे व स्फोटके होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी