सहा मंत्री आज जिल्ात
By admin | Published: December 29, 2015 11:52 PM
जळगाव- पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह सहा मंत्री ३० रोजी जिल्हा दौर्यावर आहेत. पालकमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती देणार आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर हे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप याच्या विवाहाला उपस्थिती देणार आहेत.
जळगाव- पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह सहा मंत्री ३० रोजी जिल्हा दौर्यावर आहेत. पालकमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती देणार आहेत. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर हे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप याच्या विवाहाला उपस्थिती देणार आहेत.थर्टी फस्टसाठी करमणूक करचे १६ पथके स्थापनजळगाव- ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणार्या मनोरंजनपर कार्यक्रमांवरील निगराणीसाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव शहरातील तीन हॉटेल्सने मनोरंजन कार्यक्रमासाठी परवानगी घेतली आहे. आरटीओ कार्यालयातील जप्त वाहनांचा लिलावजळगाव-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मुंबई मोटार वाहन कर कायद्यांतर्गत थकीत कराच्या वसुलीसाठी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी सांगितले.जिल्हा उद्योग सारथी माध्यम खिडकी स्थापनजळगाव- सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना त्यांच्या निर्मिती उपक्रम स्थापन करताना शासनाच्या विविध विभागाचे परवाने प्राप्त करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रस्तावित उद्योजकांसाठी उद्योग सारथी एक खिडकी माध्यम स्थापन करण्यात आली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. समितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांच्यासह महावितरण, कामगार आयुक्त, प्रदूषण नियंत्रण कार्यालय, बाष्पके संचालनालय येथील अधिकार्यांचा समावेश आहे. नागरिकांनी उद्योग सारथी एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी महाव्यवस्थापक डी.पी.पाटील यांनी केले आहे.