श्रीनगर/अमृतसर : भारतीय लष्काराने आणि पोलिसांनी रविवारी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये जबरदस्त कारवाई केली. या कारवाईत लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली. एवढेच नाही, तर त्याच्याकडून 29 लाख रुपयेही (भारतीय चलन) जप्त करण्यात आले आहेत.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ही कारवाई अनंतनाग आणि पुलवामा येथे करण्यात आली. लष्कराने या चौघांसह केवळ एप्रिल महिन्यातच 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर वर्षभरात एकूण 54 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!
कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान -जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्येही रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दक्षिण काश्मिरातील देवासर भागात रविवार सायंकाळी गस्त घालणाऱ्या पार्टीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर संरक्षण दलाच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. या भागात आणखी दोन दहशतवादी लपून बसले अल्याची शंका आहे. त्यांचा शोध सूरू आहे.
"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली
अमृतसरमध्ये पैसे घेण्यासाठी आला होता हिजबुलचा दहशतवादी -दुसरीकडे पंजाब पोलिसांनीही, हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून 29 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. हिलाल अहमद वागे, असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगाम भागातील रहिवासी आहे. त्याला 25 एप्रिलला अमृतसर येथील मेट्रो मार्टजवळून अटक करण्यात आली.
पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत समोर आले आहे, की काश्मिरातील हिजबुलचा प्रमुख रियाज अहमद नायकू याने मेट्रो मार्टजवळ एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे आणण्यासाठी त्याला पाठवले होते. एक व्यक्ती दुचाकीवर आली आणि हिलालला पैसे देऊन निघून गेली. यावेळी हिलालसह ट्रकमध्ये आणखी एक जण होता. तो अनंतनाग येथील रईस अहमद असल्याचे समजते.