शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

बापरे! पेन्सिलनं घेतला ६ वर्षीय मुलीचा जीव; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 4:12 PM

होमवर्क करण्यासाठी गेलेली आर्टिका तोंडात कटर ठेऊन पेन्सिल सोलत होती. पेन्सिलची साल तिच्या तोंडात गेली आणि ती श्वसननलिकेत अडकली

हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षीय विद्यार्थिनीचा पेन्सिलची साल घशात अडकल्याने तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, साल घशात  अडकल्यामुळे मुलीला गुदमरून जीव गमवावा लागला.

विद्यार्थिनी तोंडात कटर घेऊन पेन्सिल सोलत होती. पेन्सिलची साल घशात अडकल्याने तिचा श्वास थांबला, नातेवाईकांनी तिला सीएचसीमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोतवाली परिसरातील पहाडी वीर गावात राहणारे नंदकिशोर यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी त्यांचा मुलगा अभिषेक (१२) आणि मुली अंशिका (८) आणि आर्टिका (६) टेरेसवर अभ्यास करत होते.

होमवर्क करण्यासाठी गेलेली आर्टिका तोंडात कटर ठेऊन पेन्सिल सोलत होती. पेन्सिलची साल तिच्या तोंडात गेली आणि ती श्वसननलिकेत अडकली. यानंतर ती निष्पाप मुलगी जमिनीवर अचानक खाली कोसळली.  मृत तरुणी गावातील प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती. मुलीच्या मृत्यूनंतर आई अनिता हिची रडून प्रकृती बिघडली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यास असे अपघात टाळता येतील असं या घटनेबाबत सीएचसीचे डॉक्टर सत्येंद्रकुमार यादव यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, मुलांना झोपून अन्न खाण्यापासून किंवा पाणी पिण्यापासून देखील प्रतिबंधित केले पाहिजे कारण अन्न श्वसननलिकेत अडकल्याने मृत्यू होऊ शकतो. सामान्यतः मुलांना कोणतीही गोष्ट उचलून तोंडात घालण्याची सवय असते, अशा परिस्थितीत पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं.