आबूरोड - राजस्थानच्या आबूरोडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच त्यांनी लेकाचा सांगाडा घरामध्ये जपून ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाची हत्या झाल्याचं वडिलांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी सामान्य मृत्यू म्हणून या केसची फाईल बंद केली आहे. त्यामुळेच त्यांनी मुलाच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं म्हटलं आहे.
राजस्थानमधील आबूरोड गावातील ही घटना असून या गावचे रहिवासी असलेले हगराभाई यांनी 21 महिन्यांपासून आपल्या मुलाचा सांगाडा घरात ठेवला आहे. नटूभाई असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. 27 ऑगस्ट 2018 रोजी तो घरातून निघाला होता. 5 सप्टेंबर 2018 रोजी गावाबाहेरील रस्त्यावर त्याचा मृतदेह सापडला. हगराभाई यांनी याप्रकरमी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांना मुलांची हत्या झाल्याचा संशय आहे. मात्र पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून ही केस बंद केली.
हगराभाई यांनी जोपर्यंत मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या 21 महिन्यांपासून त्यांनी आपल्या घरातील शौचालयात मुलाचा सांगाडा जपून ठेवला आहे. हदाडचे पीएसआय महावीरसिंग जडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 चं हे प्रकरण आहे. तेव्हा पीएसआय डीआर पारगी होते. त्यांनी याचा तपास केला होता. यानंतर मी हे प्रकरण देखील पाहिले. अहमदाबादमध्ये पोस्टमार्टम करण्यात आलं. मात्र पोस्टमार्टममध्ये ही हत्या असल्याचं आढळून आलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका