शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

या 'तेराव्या' विमानामुळे 12 मिराज जेटचा पाकिस्तानवर यशस्वी 'एअर स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 7:27 AM

पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12  लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले.

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12  लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले. या विमानाचे नाव आहे नेत्रा. महत्वाचे म्हणजे हे अस्सल भारतीय बनावटीचे विमान आहे. 

नेत्रा हे विमान या मिराजच्या विमानांना मार्गदर्शन करण्याबरोबरच शत्रूकडून मिसाईल डागली गेल्याचेही सांगत होते. तसेच पाकिस्तानच्या लष्कराचे संभाषणही टिपून त्यांच्या हालचाली या वैमानिकांना कळवत होते. या ऑपरेशनमध्ये नेत्रा ने खूप मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, या विमानाची कामगिरी प्रकाशात आली नाही. नेत्रा हे हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा असलेले विमान आहे. हे विमान भारताच्या हवा ईहद्दीतच उडत होते. मात्र, लक्ष पूर्ण पाकिस्तानवर होते. 

सध्या भारताकडे या प्रकारची दोनच विमाने आहेत. या विमानाने मिराजच्या ताफ्याला त्यांच्यावर डागलेल्या मिसाईलची सूचना देत होते. यासाठी नेत्रामध्ये इन्फ्रारेड प्रणाली बसविण्यात आली होती, जी मिसाईल सोडल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या उष्णता टिपते. 

काय आहे नेत्रा? नेत्रा हे विमान भारतीय डीआरडीओच्या संशोधकांनी बनविले आहे. निवृत्त संशोधक आणि एअरबॉर्न सिस्टिमचे अध्यक्ष एस ख्रिस्तोफर यांनी हे विमान आणि प्रणाली विकसित करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे. या विमानामध्ये भारतीय बनावटीचे इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर बसविण्यात आलेले आहे. महत्वाचे म्हणजे या विमानाला एकही कॅमेरा नसून केवळ उच्च प्रतीच्या सेन्सरच्या माध्यामातून हे विमान पाकिस्तानच्या लष्कारचे संभाषण ऐकू शकते. तसेच भारतीय हद्दीत राहून पाकिस्तान सोडत असलेली मिसाईलचा अचूक अंदाज लावू शकते. 

नेत्रा शत्रूच्या प्रदेशात 450 ते 500 किमी दूरूनच लक्ष ठेवू शकते. यासाठी एअरबॉर्नला 120 डिग्रीचा व्ह्यू देण्यात आलेला आहे. नेत्रा रडारचे सिग्नलही पकडू शकते. हे विमान नवी दिल्लीमधील डेटा सेंटरला माहिती पाठविते. हे विमान एका वेळी 5 तास उडू शकते. शिवाय हवेतच इंधन भरल्यास 9 तासांचे उड्डाण करू शकते. 

सध्या भारतीय हवाई दलाला दोन विमाने देण्यात आली असून तिसरे विमान डीआरडीओकडे चाचणीसाठी बनविलेले आहे. नेत्रा या विमानची बांधणी 2007 मध्ये सुरु झाली. यासाठी 2460 कोटी रुपयांचा खर्च आला. पहिले विमान 2017 मध्ये हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. आज या विमानामध्ये केलेली गुंतवणूक फळाला आली, अशी प्रतिक्रिया ख्रिस्तोफर यांनी दिली आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानDRDOडीआरडीओ