'स्लीप ऑफ टंग'... राहुल गांधी मसूद अझहरला म्हणाले 'मसूद अझहरजी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 07:39 PM2019-03-11T19:39:57+5:302019-03-11T19:40:41+5:30
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपाला लक्ष्य केले. मात्र...
नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपाला लक्ष्य केले. मात्र भाजपावर टीका करण्याच्या भारात राहुल गांधींनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. त्यामुळे भाजपाला घेरण्याच्या नादात राहुल गांधी स्वत:च अडचणीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. तसेच भाजपाच्या याआधीच्या सरकारनेच मसूद अझहरला सोडल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मात्र यादरम्यान भाजपावर टीका करण्याचा भारात राहुल गांधी यांनी मसूद अजहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला.
#WATCH Rahul Gandhi in Delhi: You would remember that during their(NDA) last Govt, current National Security Advisor Ajit Doval went to Kandahar to hand over Masood Azhar. pic.twitter.com/xTErFR6rjV
— ANI (@ANI) March 11, 2019
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपाने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. देशाच्या वीर जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यासाठी राहुल गांधी यांच्या मनात एवढा सन्मान? असा प्रश्न भाजपाने विचारला आहे.
मात्र कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, तसेच डोकलाम प्रश्नी मोदी सरकारने घेतलेली भूमिका यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
Rahul Gandhi: When Doklam issue was on, PM Modi went to China and held a meeting without agenda.He bowed before China with folded hands and said keep Doklam and that no one in India will come to know and the media will be tackled.Matter over.This is the reality of Modi ji pic.twitter.com/ILt6qqXeNp
— ANI (@ANI) March 11, 2019