नवी दिल्ली - कोरोना व्हायरस महामारीसंदर्भातील नियमांचे पालन करत आज (बुधवारी) संसदेचे पावसाळी अधिवेश संपले. 17व्या लोकसभेच्या या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदीही मास्क लाऊन लोकसभेच्या कामकाजात सहभागी झाले होते. मोदी संसदेत पोहोचताच सभागृहात भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा द्यायला सुरुवात झाली. यानंतर मोदींनी हात जोडून सर्वांना प्रतिसाद दिला. तसेच, हे पावसाळी अधिवेश ऐतिहासिक असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी म्हटले आहे.
आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण
सभागृहाचे कामकाज 23 तास अधिक चालले -लोकसभा अध्यक्षांनी सांगितले, 14 सप्टेंबरपासून सुरू झलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या 10 बैठका अवकाश न घेता पार पडल्या. यात 37 तासांच्या ऐवजी एकूण 60 तास काम चालले. अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज निर्धारित वेळेपेक्षाही 23 तास अधिक चालले.
लोकसभेत 25 विधेयकांना मंजुरी -ओम बिरला यांनी सांगितले, या अधिवेशनात खालच्या सभागृहाने आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक - 2020, शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक - 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) दर हमी विधेयक - 2020 आणि कृषी सेवेवर करार विधेयक - 2020, आदी एकूण 25 विधेयकांना मंजुरी दिली आहे.
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
लोकसभा आणि राज्यसभेचे हे पावसाळी अधिवेश कृषी विधेयकांसाठी चर्चेत राहीले. यावेळी काँग्रेसच्या आवाहनानंतर सर्वच विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. तसेच अनेक विधेयके विरोधकांशिवाय मंजूर करण्यात आले.
CoronaVaccine : रशिया UN कर्मचाऱ्यांना मोफत देणार कोरोना लस, WHOनेही केली रशियन लशीची 'तारीफ'?