शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

स्लो इंटरनेटवरही पाहा व्हिडीओ, भारतात YouTube Go लॉन्च

By admin | Published: April 05, 2017 7:10 PM

खास भारतासाठी बनवण्यात आलेलं मोबाइल अॅप YouTube Go लॉन्च करण्यात आलं आहे. गुगलने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - खास भारतासाठी बनवण्यात आलेलं मोबाइल अॅप YouTube Go लॉन्च करण्यात आलं आहे. गुगलने मंगळवारी याबाबत माहिती दिली. या अॅपद्वारे स्लो इंटरनेट असेल तरीही व्हिडीओ पाहताना बफरिंग होणार नाही असा दावा करण्यात आला आहे. या अॅपला आम्ही भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती म्हणून पाहत आहोत, कारण भारतात अजूनही फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी एक मोठी समस्या आहे असं कंपनीने म्हटलं आहे.  
 
यु ट्यूब या मुख्य अॅपचं YouTube Go हे लाइटर व्हर्जन आहे. या अॅपद्वारे व्हिडीओ डाऊनलोड करणं आणि शेअर करणं अगदी सहज शक्य होणार आहे. लाइटर व्हर्जन असल्याने अॅप वापरताना युजरला जास्त कंट्रोल मिळेल तसेच स्लो इंटरनेट स्पीड असेल तरीही अॅप योग्य प्रकारे काम करेल असा दावा करण्यात आला आहे. या अॅपचं बीटा व्हर्जन उपलब्ध आहे, गुगल प्ले स्टोअरवरून बीटा व्हर्जन डाऊनलोड करता येऊ शकतं. 
 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलने या अॅपची घोषणा केली होती, मात्र युट्यूबने आत्ता हे अॅप युजर्ससाठी उपलब्ध केलं आहे. अॅप आणखी चांगलं बनवण्यासाठी थोडा वेळ घेतला असं गुगलने सांगितलं आहे.