नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच, पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या 'मोफत सेवा' मुद्द्यांवरून भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
बुधवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय सिंह यांनी सांगितले की, गौतम गंभीर मोफत सेवेच्या विरोधात आहेत. तर त्यांनी खासदार म्हणून मिळणारी 50 हजार युनिट वीज सरेंडर केली पाहिजे. ते पूर्णपणे नाटक करत आहेत. यावर गौतम गंभीर यांनी लगेच ट्विट करून संजय सिंह यांच्यावर पलटकार केला आहे.
गौतम गंभीर ट्विटमध्ये म्हणाले, "मी कधीच बोललो नाही की, गरिबांना मोफत सुविधा दिल्या जाऊ नयेत. मात्र, काही लोक या सुविधांचा अफॉर्ड करतात, ते काहीतरी चार्ज देऊ शकतात." तसेच, आपल्या माहितीसाठी गेल्या आठ महिन्यात मी एकाही सरकारी सुविधेचा फायदा घेतला नाही. तुम्ही ढोंगी मुख्यमंत्र्यांसारखे गेल्या पाच वर्षांपासून करदात्यांच्या पैशावर आपला प्रचार करत आहात, असेही गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. 2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या
'आप'नं 15 आमदारांचं तिकीट कापलं, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन'
CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त
अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा
सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा
शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ