शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

उघड्यावर लघुशंका; केंद्रीय मंत्र्यावर टीका

By admin | Published: June 30, 2017 12:35 AM

सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग उघड्यावर लघुशंका करत असतानाचे एक छायाचित्र समाजमाध्यमांत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सुरक्षारक्षकांच्या पहाऱ्यात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग उघड्यावर लघुशंका करत असतानाचे एक छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी मंत्री महोदयांवर टीकेची झोड उठविली व पंतप्रधान मोदींच्या लाडक्या स्वच्छ भारत मिशनचीही टर उडविली. पण त्यामुळे भारतात रस्त्यांवर स्वच्छतागृहे नसल्याने लोकांची कशी अडचण होते, हेही स्पष्ट झाले. महिलांचे तसेच वृद्ध व मधुमेह असलेल्यांचे तर स्वच्छतागृहे नसल्याने प्रवासात नेहमीच हाल होत असतात.राधा मोहन सिंग यांचे छायाचित्र दिवसभर टिष्ट्वटरवर फिरले आणि ते चर्चा, टीका व उपाहासाचा विषय ठरले. आपल्याविषयीचा हा बोलबाला स्वत: राधा मोहन सिंग यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी छायाचित्रात दिसणाऱ्या आपल्या कृतीचे समर्थन केले. ते छायाचित्र राष्ट्रीय महामार्ग क्र. २८वरील पिपारा येथील एका धाब्याच्या परिसरातील असल्याचा खुलासा त्यांनी केला. छायाचित्रात दिसणारे ते ठिकाण मंत्र्यांच्या चंपारण्य मतदारसंघातील आहे.राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना बऱ्याच दूरपर्यंत नैसर्गिक विधी उरकण्याची कुठे सोय नव्हती म्हणून गाडी थांबवून आपल्याला त्या ठिकाणी लघुशंका उरकावी लागली. पण हे करताना आपला हेतू वाईट नव्हता, अशी मल्लिनाथी कृषिमंत्र्यांनी केली. बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाने आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलवर हा फोटो प्रसिद्ध केला व सोबत असे उपरोधिक भाष्यही टाकले: राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात सिंचन योजनेचे उद््घाटन करून केंद्रीय कृषिमंत्र्यांनी स्वच्छ भारत अभियानालाही दिली बळकटी! बिहार प्रदेश भाजपाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनीही मंत्र्यांची पाठराखण करताना म्हटले की, मंत्रीसाहेबांनी काहीच चुकीचे केले नाही. दूरवरचा प्रवास करताना वाटेत कुठे सोय नसेल तर माणूस नैसर्गिक विधी किती वेळ रोखून ठेवणार?