नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. मतदारांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगासह सामाजिक संस्थांकडूनही आवाहन केले जात आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास, पायाभूत सुविधा फारशा उपलब्ध नसणाऱ्या राज्यांत मतदानाचे प्रमाण अधिक होते. मात्र, विकसित राज्यात ते प्रमाण कमी असल्याचे दिसते.
८० टक्के पेक्षा अधिकलक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश
७०-८० टक्केदादरा व नगर हवेली, केरळ, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, दमण-दीव, छत्तीसगड, मेघालय, मध्य प्रदेश, चंडीगड, हरयाणा
६०-७० टक्केकर्नाटक, झारखंड, राजस्थान, पंजाब, अंदमान-निकोबार, गुजरात, मिझोराम, तेलंगणा, उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्ली
५०-६० टक्केउत्तर प्रदेश, बिहार
५० टक्केपेक्षा कमी जम्मू-काश्मीर
‘या’ राज्यांकडून घ्यावा धडा२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या १० राज्यांमध्ये ईशान्येतील नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम या सहा राज्यांचा समावेश होता. दुर्गम प्रदेश असतानाही ही राज्ये मतदान करण्यात आघाडीवर होती.