नवी दिल्ली : गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत स्मार्ट फोन बाजारातील ५१ टक्के वाटा प्रमुख ३० शहरांत होता, असे एका अहवालात म्हटले आहे.आयडीसी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. स्मार्ट फोनची सर्वाधिक मागणी दिल्लीत असून, त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. स्मार्ट फोनचे आकर्षण जसे जसे वाढेल तसे तसे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरातील बाजाराचा हिस्सा बनेल, असे हा अहवाल म्हणतो.दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील प्रमुख २५ शहरांत स्मार्ट फोनचा हिस्सा २१.३ टक्के आहे. आयडीसी दक्षिण आशियाचे प्रबंधक जयदीप मेहता म्हणाले की, डाटा उपलब्ध होण्याने आणि ई कॉमर्सच्या विस्तारासोबत दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरातील स्मार्ट फोनचे ग्राहक जागरूक होत आहेत. त्यातच आता ४ जीतील स्मार्टफोनमुळे या क्षेत्रात अधिक वृद्धी पाहायला मिळू शकेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
स्मार्ट फोन बाजारात ५१ टक्के वाटा ३० प्रमुख शहरांचा
By admin | Published: March 04, 2016 2:15 AM