स्मार्ट ग्राम -खंडोबाचीवाडी (मोहोळ) - अशोक कांबळे
By admin | Published: February 23, 2016 2:01 AM
स्मार्ट ग्राम -खंडोबाचीवाडी (मोहोळ) - अशोक कांबळे
स्मार्ट ग्राम -खंडोबाचीवाडी (मोहोळ) - अशोक कांबळेग्रामदैवत - खंडोबा देवस्थानलोकसंख्या- 2045, पुरुष - 1130 + स्त्री- 915शिक्षणाचे प्रमाण - 72 }पाण्याचा स्रोत - विहीर व हातपंप (विंधन विहिरी)शैक्षणिक सुविधा - जि.प. शाळा 7 वीपर्यंत.पदाधिकारी - सरपंच- गया सुदाम गुंडउपसरपंच- अगतराव रंगनाथ गुंडसदस्य - रतन मारुती माळी, पुष्पा नितीन शिंदे, सुरेश नरसू गायकवाड, प्रताप अशोक मुसळे, भाग्यर्शी अनिल कदम, माधुरी भाऊराव इंगळे, हनुमंत गजेंद्र शिंदेग्रामविकास अधिकारी - एस.डी. खंदारेवैशिष्ट्ये - अनगरपासून 5 कि.मी. अंतरावर असणार्या खंडोबाचीवाडी गावाचे ग्रामदैवत र्शी खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. या देवाची यात्रा चैत्र महिन्यात भरते. या देवस्थानला मा.आमदार राजनजी पाटील यांच्या फंडातून भव्य सभामंडपाचे काम झालेले आहे. सर्वधर्मसमभाव असणार्या या देवस्थानच्या पंचकमिटीचे कामकाज मा. आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील देवस्थान हे जवळपास 70 लाखांचे असून प्रत्येक वर्षी हे पैसे त्याच गावातील खातेदारांना नाममात्र टक्केवारी आकारून दिले जातात व त्याच व्याजाच्या रकमेतून त्या वर्षाची यात्रा पार पाडली जाते व ते पैसे पुन्हा देवस्थान कमिटीकडे जमा केले जातात. अशाप्रकारे ही यात्रा तब्बल 4 दिवस चालते व शेवटी जिल्?ातील वाघ्यामुरळी यांना बोलावून शेवट केला जातो.तसेच हे गाव मा. आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत बिनविरोध ग्रामपंचायत म्हणून घोषित केले जाते. ग्रा.पं. स्थापनेपासून आजतागायत कधीही निवडणूक लागलेली नाही. आतापर्यंत बिनविरोध ग्रामपंचायत आहे.या गावाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, लोकराज पुरस्कार, यशवंत पंचायत राज पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हे गाव प्रत्येक वर्षी 100 टक्के कर वसुली करत असते.विकासाची घोडदौड - माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार्या ग्रामपंचायतीने गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या दोन विहिरी, दोन टाक्या, सर्व गावामध्ये नळ कनेक्शन, सभामंडप, काँक्रिट रस्ते, डांबरी रस्ते, हरियाली योजना इ. कामे केली आहेत.अपेक्षित विकासकामे - पाण्याची योग्य सोय करून मीटर बसविणे, पाणी अडवा, पाणी जिरवा योजना राबविणे, पुनर्भरण करणे इ. लोकनेते बाबुरावअण्णा पाटीलमार्गदर्शक राजनजी पाटील