ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - स्मार्टफोन वापरणा-यांसाठी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे बॅटरीची. स्मार्टफोनची बॅटरी वारंवार कमी होत असल्याने होणारा मनस्ताप, आणि त्यातही चार्जिंग करणं शक्य नसल्यास त्यामध्ये पडणारी भर यामुळे अनेकांची चिडचिड होत असते. अनेकांची कामं फक्त मोबाईलच्या माध्यमातूनच होत असतात, त्यामुळे दिवसभर तरी ती टिकावी यासाठी विनाकारण मग चार्जर तसंच पोर्टेबल पॉवर बँक घेऊन फिरावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, स्मार्टफोनची बॅटरी जास्तीत जास्त वेळ टिकवणं आपल्याच हाती असतं.
अनेकदा विनाकारण डाऊनलोड केलेलं अॅप स्मार्टफोनची बॅटरी कमी करण्यास कारणीभूत ठरत असतात. यातील काही अॅप कामाचेही असतात. सेक्यूरिटी कंपनी एव्हीजीने अशा 10 अॅप्सची यादी तयार केली आहे जे स्मार्टफोन्सची बॅटरी कमी करतात. तुम्हाला गरज नसल्यास हे अॅप्स तात्काळ मोबाईलमधून अनइन्स्टॉल करुन टाका.
1) Candy Crush Saga
एव्हीजीनुसार या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे गेमिंग अॅप - Candy Crush Saga. या गेमिंग अॅपमुळे फक्त बॅटरीवरच परिणाम होत नाही तर यासाठी खूप स्पेसही जातो. तसंच हे अॅप खूप डाटा वापरतो.
2) Pet Rescue Saga
या लिस्टमध्ये दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे प्रसिद्ध गेम Pet Rescue Saga. एव्हीजीनुसार हे अॅप बॅटरी, स्टोरेज आणि डाटा तिघांसाठी खर्चिक आहे.
3) Clash of Clans
लिस्टमध्ये तिसरा अॅप आहे Clash of Clans. हे गेमिंग अॅप बॅटरीसाठी खूप घातक असून अत्यंत वेगाने बॅटरी संपवतो.
4) Google Play Services
गूगल प्ले सर्व्हिसेस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एव्हीजीने सांगितल्यानुसार या अॅपचं बॅटरी, स्टोरेज आणि डाटा वापर जास्त आहे.
5) OLX
एव्हीजीच्या यादीत भारतातील क्लासिफाईंड अॅप OLX चाही समावेश आहे.
6) Facebook
जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग अॅप फेसबूक या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये हमखास हे अॅप आढळतं. पण स्मार्टफोनची बॅटरी कमी करण्यात या अॅपचाही तितकाट वाटा आहे.
7) WhatsApp
व्हाट्सअॅप जगातील पहिल्या क्रमांकाचं मेसेजिंग अॅप आहे. फेसबूकप्रमाणे व्हाट्सअॅपही अनेकांच्या मोबाईलमध्ये हमखास आढळतं. मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त खर्च करण्यात व्हाट्सअॅपही अग्रेसर आहे.
8) Lookout Security & Antivirus
आठव्या क्रमांकावर आहे मोबाईल सेक्युरिटी अॅप लूकआऊट सेक्यूरिटी अॅप अॅण्ड अॅन्टी व्हायरस. हे अॅप मोबाईलला यरस, हॅकिंग अटॅकपासून वाचवण्याचा दावा करतं.
9) Android weather & clock widget
एव्हीजीनुसार अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनवर हे अॅप बॅटरीसाठी जास्त खर्चिक ठरतं.
10) Solitaire
दहाव्या क्रमांकावर आहे Solitaire गेमिंग अॅप. या अॅपमुळे मोबाईलची बॅटरी वेगाने कमी होते.