शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
3
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
4
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
6
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
7
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
8
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
9
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
10
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
11
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
12
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
13
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
14
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
15
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
16
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
17
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
18
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
19
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
20
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

"राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 1:32 PM

"भारतमातेची हत्या करण्याच्या वाक्यावर टाळ्या वाजवण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला"

Smriti Irani vs Rahul Gandhi, Monsoon Session of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या वेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. राहुल गांधींच्या भाषणाला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मणिपूरच्या हिंसाचारावर मौन बाळगले. यातून असे दिसून येते की, मोदी सरकारने मणिपूरमध्ये  भारतमातेची हत्या केली," असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. यावर स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील हिंसेच्या घटना व अत्याचाराच्या घटनांविषयी मांडणी केली. तसेच, राहुल गांधींना संसदेतूनच थेट आव्हान दिले. 

राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर...

"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यातही अशा विधानांवर काँग्रेस पक्ष इथे बाकं वाजवत होता, टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेच्या हत्येच्या गोष्टींवर टाळ्या वाजवून यांनी साऱ्या देशाला सूचित केले की नक्की कोणाच्या मनात विश्वासघाताची भावना आहे. मणिपूरचे तुकडे अजिबात झालेले नाहीत, तो विभागलेला नाही. तो अजूनही देशाचाच भाग आहे. पण तुमच्या मित्र पक्षाचे नेते तामिळनाडूत म्हणाले की, भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्या द्रमुकच्या सहकाऱ्याचे खंडन करून दाखवा. काश्‍मीर भारतापासून वेगळे करण्‍याची चर्चा करण्याची भाषा करणाऱ्या काश्मीरमधील काँग्रेस नेत्यांचा  विरोध करून दाखवा," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले.

काँग्रेसच्या कार्यकाळातील घटनांचा वाचला पाढा...

स्मृती इराणी यांनी काश्मीरमध्ये पंडितांवर झालेल्या अत्याचाराचाही उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी काही अत्याचार पिडित महिलांचा व त्यांच्याबाबतच्या घटनांचाही यावेळी उल्लेख केला. "तुम्ही आम्ही काश्मिरी पंडितांबद्दल बोलू इच्छित नाही. त्यांनी अश्रू ढाळले, दौरे केले. पण 1984 च्या दंगलीत पत्रकार प्रणय गुप्ता यांनी लिहिलं होतं की, मुलांना मारून त्यांचे मृतदेह आईच्या पुढ्यात टाकण्यात आले होते. नुकतेच राजस्थानच्या भिलवाडा येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ते कापण्यात आले. मग भट्टीत ठेवण्यात आले. दोन महिला खासदार तिथे गेल्या होत्या. तेथे मुलीचा एक हात भट्टीच्या बाहेर पडला होता. बंगालमध्ये एका ६० वर्षीय महिलेवर तिच्या नातवासमोर बलात्कार झाला, तेव्हा या काँग्रेसच्या लोकांनी न्यायासाठी याचना केली नाही. यावर एक शब्दही बोलण्यात आला नाही," अशा शब्दांत भाजपविरोधी राज्यांतील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी भाष्य केले.

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन