सुनीता विश्वनाथसोबत काय चर्चा झाली? फोटो दाखवत स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:03 PM2023-06-28T19:03:08+5:302023-06-28T19:04:21+5:30
स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
Smriti Irani On Rahul Gandhi: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन मोठा आरोप केला आहे. "सुनीता विश्वनाथ राहुलसोबत अमेरिकेत बसल्या होत्या. जॉर्ज सोरोस हे भारताविरोधात काम करत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे आणि सुनीता विश्वनाथ यांचेही सोरोस यांच्याशी संबंध आहेत," हा मुद्दा उपस्थित करत इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, "राहुल गांधी जॉर्ज सोरोस यांच्याशी काय बोलत होते, याची माहिती त्यांनी देशाला द्यायला हवी. सोरोस यांची भारतविरोधी विचारसरणी आपल्यापासून लपलेली नाही. अशा स्थितीत राहुल यांनी भारताबाहेरील भारतविरोधी लोकांना का भेटले, हे त्यांनी सांगावे?"
जॉर्ज सोरोस आणि राहुल गांधींचे जुने नाते
स्मृती यांनी दावा केला की, "जॉर्ज सोरोस आणि त्यांच्याकडून अर्थसहाय्य मिळवणाऱ्या संस्थाचा राहुल गांधींसोबत जुना संबंध आहे. ओपन सोसायटीचे जागतिक अध्यक्ष असलेले सलील सेठी नावाचे गृहस्थ जॉर्ज सोरोस यांच्या संस्थेचे सदस्य असल्याचे एका प्रकाशनात उघड झाले आहे. तेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतदेखील होते."
The lady seated on the high table next to Rahul Gandhi, during his interaction with ‘Think Tanks’ in DC, is Sunita Vishwanath.
— Amit Malviya (@amitmalviya) June 2, 2023
Who is she exactly?
Sunita Vishwanath is the co-founder of Hindus for Human Rights (HfHR) and co-hosts multiple events with rabid organisations like… pic.twitter.com/ZhO1wiQ8ff
फोटोद्वारे केला दावा
त्या पुढे म्हणाल्या की, ''जॉर्ज सोरोस यांना भारतातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार कसे हटवायचे होते, हा मुद्दा भाजपने यापूर्वीही उपस्थित केला आहे. राहुल यांचा अमेरिका दौरा भाजपने त्यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित असल्याची माहिती भाजपला मिळत आहे.'
कोण आहे सुनीता विश्वनाथ?
यापूर्वी भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी ट्विट केले होते, "डीसीमध्ये 'थिंक टँक'शी संभाषण करताना राहुल गांधींच्या शेजारी उंच टेबलावर बसलेली महिला सुनीता विश्वनाथ आहे. सुनीता विश्वनाथ हिंदूज फॉर ह्युमन राइट्स (HFHR) च्या सह-संस्थापक आहेत आणि भारतीय अमेरिकन मुस्लिम कौन्सिल (IAMC) सारख्या कट्टरपंथी संघटनांसोबत काम करतात.''