माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार, आरोपानंतर स्मृती इराणी चांगल्या भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 09:00 AM2022-07-24T09:00:31+5:302022-07-24T09:01:22+5:30
स्मृती इराणींच्या मुलीचा गोव्यात बेकायदेशीर बार; काँग्रेसचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यात बेकायदेशीर बार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केला.
स्मृती यांच्या मुलीच्यावतीने हे आरोप फेटाळण्यात आले. त्यांचे वकील कीरत नागरा म्हणाले की, त्या सिली सोल्स नावाच्या रेस्टॉरंटच्या ना मालक आहेत, ना त्याचे संचालन करतात. स्मृती यांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, ही लढाई आपण न्यायालयात न्यायालयात लढू. काँग्रेसने म्हटले की, उत्पादन शुल्क विभागाने इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आरटीआयमधून मिळाली. इराणींच्या मुलीने सिली बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले, असा आरोप खेडा यांनी केला.
माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५००० कोटींच्या लुटीबाबत आपण आवाज उठविल्याने माझ्या मुलीला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार केला आहे. माझी १८ वर्षीय मुलगी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे आणि कोणताही बार चालवित नाही. तिची चूक एवढीच आहे की, तिच्या आईने २०१४ व २०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लढविली.
- स्मृती इराणी,
केंद्रीय मंत्री