मोदींच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 10:46 AM2019-05-31T10:46:32+5:302019-05-31T11:27:46+5:30
स्मृती इराणी यांचे वय ४३ वर्षे असून या मंत्रीमंडळातील त्या सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. तर मोदींच्या नवीन मंत्रीमंडळाचे सरासरी वय ६० वर्षे आहेत. तर मागील मंत्रीमंडळाचं सरासरी वय ६२ वर्षे होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी नव्या मंत्रीमंडळात सामील झालेल्या अनेक मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळात अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी सर्वात युवा केंद्रीयमंत्री ठरल्या आहेत.
स्मृती इराणी यांचे वय ४३ वर्षे असून या मंत्रीमंडळातील त्या सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. तर मोदींच्या नवीन मंत्रीमंडळाचे सरासरी वय ६० वर्षे आहेत. तर मागील मंत्रीमंडळाचं सरासरी वय ६२ वर्षे होते. स्मृती इराणी यांच्या व्यतिरिक्त अनुराग ठाकूर यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांचे वय ४४ वर्षे आहे. या व्यतिरिक्त मनसुख मंडाविया (४६), संजीव कुमार बालियान (४६) आणि किरण रिजिजू (४७) यांचे वय देखील ५० वर्षांच्या आत आहे.
So, that, in a nutshell, is how the new Council of Ministers looks...
— PIB India (@PIB_India) May 30, 2019
Graphics courtesy KBK#ModiSwearingIn#ModiSarkar2#ModiCabinetpic.twitter.com/7cPbOv8g2L
दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान ७३ वर्षांचे असून मंत्रीमंडळातील सर्वात वयस्कर मंत्री ठरले आहेत. तर थावर चंद गहलोत आणि संतोष कुमार गंगवार यांचं वय ७१ वर्षे आहे.