शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 1:14 PM

स्नायपर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचा सूचक इशारा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून स्नायपर्सच्या सहाय्यानं भारतीय लष्कराला लक्ष्य केलं जात आहे. यावरुन आता भारतीय सैन्यानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचं स्नायपर ऑपरेशन जवानांचं शीरकाण केल्यासारखं आहे. त्यामुळे लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. याचा बदला लवकरच घेतला जाईल, अशा शब्दांमध्ये लष्करानं यावर भाष्य केलं. शुक्रवारी पाकिस्तानी स्नायपर्सच्या हल्ल्यात लष्कराचे दोन जेसीओ शहीद झाले. काश्मीरच्या कुपवाड्यात ही घटना घडली. एलओसीवर स्नायपिंग मोर्टार, लाईट आर्टिलरी आणि एँटी-टँक गायडेड मिसाईलच्या वापरामुळे दहशत निर्माण होते, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं. त्यामुळे आम्ही लवकरच आमच्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदल घेऊ, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. हा बदला कधी घ्यायचा आणि कुठे घ्यायचा हे भारतीय लष्कर ठरवेल, अशी माहिती दुसऱ्या लष्करी अधिकाऱ्यानं दिली. भारतीय लष्कराकडे असलेल्या स्नायपर्स जुन्या आहेत. भारतीय जवान 7.62 एमएम ड्रॅगनोव सेमी-ऑटोमॅटिक स्नायपर राइफल्सचा वापर करतात. ही रायफल रशियन बनावटीची आहे. 1960 च्या दशकात या रायफलची निर्मिती करण्यात आली. या रायफलची मारक क्षमता 800 मीटर इतकी आहे. लष्कराकडून गेल्या अनेक वर्षांपासून 5719 8.6 एमएम स्नायपर रायफलची मागणी सुरू आहे. या रायफलची मारक क्षमता 1200 मीटर इतकी आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर