हिमालय पर्वतातून बर्फ वेगाने वितळत असल्यानं शास्त्रज्ञांनी हिमाचल प्रदेश राज्यासह इतर राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. कारण हिमालयातील बर्फ अधिक वेगाने वितळल्यास भविष्यात पाण्याचे मोठे संकट उद्भवू शकते, असा इशारा हिमाचल हवामान बदल केंद्राच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत हिमाचल प्रदेशात एकूण बर्फाचे प्रमाण 0.72 टक्क्यांनी कमी झाले आहे.हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वैज्ञानिकांनी सांगितले की, हिमाचलमध्ये सन 2018-19मध्ये बर्फाचे आवरण 20,210 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त होते. जे 2019-20 मध्ये 20,064 चौरस किलोमीटरपर्यंत घसरले आहे. याचा थेट परिणाम हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या राज्यात राहणा-या लोकांवर होणार आहे. उन्हाळ्यात नद्यांच्या प्रवाहावर बर्फाच्या निरंतर घटाचा परिणाम होतो. तज्ञांच्या मते, वेगाने बर्फ वितळण्यामुळे आगामी काळात पाण्याची कमतरता भासू शकते. हिमाचलच्या या नद्यांमधून ज्या राज्यांमध्ये पाणी जाते त्या राज्यांसाठी प्रचंड संकट ओढवेल. पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर.हवामान बदल केंद्राने राज्यात हिमवृष्टीचे क्षेत्र तयार केले असून, त्याचा अभ्यास केला आहे. या अहवालात, व्यास आणि रावी नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास केला गेला. तर येथे असे दिसून आले की, येथे हिमवर्षावात लक्षणीय घट झाली आहे. सतलज खो-यात तुलनेने जास्त बर्फ पडलेला दिसत आहे. एप्रिलमध्ये चिनाब खो-यात एकूण 87 टक्के पाऊस हिमवर्षावात होतो. तर मेमध्ये तो कमी होऊन 65 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच चिनाब खो-यात 22 टक्के हिमवृष्टी झाली. ऑगस्टमध्ये हे बर्फ आणखी वितळणे अपेक्षित आहे.एप्रिलमध्ये व्यास खो-यातील 49 टक्के भाग बर्फाने व्यापलेला आहे. मेपर्यंत ते 45 टक्के एवढा तो झाला आहे. म्हणजेच व्यास नदीच्या पाणलोट क्षेत्रात चार टक्के बर्फ कमी झाला आहे. एप्रिलमध्ये रावी खोरे 44 टक्के होते, जे मेमध्ये घटून ते 26 टक्क्यांवर आले आहे. म्हणजे 18 टक्के बर्फ वितळला आहे. ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदलामुळे हिमाचलच्या हिमालयातील पर्वतरांगांमधील बर्फ वेगाने वितळत आहे.
हेही वाचा
अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी
बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे
धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह
हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन
रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख
टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर