शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 07:17 IST

यासंदर्भात या संशोधन अहवालाच्या सह-संशोधक, नायजेरियातील इबादान विद्यापीठाच्या प्राध्यापिका इरुका ओकेके यांनी सांगितले की, “जगभरातील रुग्णांपर्यंत प्रभावी प्रतिजैविक औषधांचा सुलभ पुरवठा आवश्यक आहे. शास्वत विकासासाठी ही प्रतिजैविक औषधे सुलभपणे प्रदान करणे आवश्यक आहे. 

नवी दिल्ली : एका विश्लेषणानुसार, संसर्ग प्रतिबंधक उपायांमध्ये सुधारणा केल्यास, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रतिवर्षी अँटिमाइक्रोबियल रेझिस्टन्समुळे (एएमआर) होणारे सुमारे ७.५ लाख मृत्यू रोखले जाऊ शकतात, असे लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय चमूचा असा अंदाज आहे की, जगात दरवर्षी प्रत्येक आठपैकी एक मृत्यू हा जीवाणू संसर्गामुळे होतो, जगात एकूण ७.७ दशलक्ष मृत्यूपैकी ५ दशलक्ष जीवाणूंशी संबंधित आहेत.

यासंदर्भात या संशोधन अहवालाच्या सह-संशोधक, नायजेरियातील इबादान विद्यापीठाच्या प्राध्यापिका इरुका ओकेके यांनी सांगितले की, “जगभरातील रुग्णांपर्यंत प्रभावी प्रतिजैविक औषधांचा सुलभ पुरवठा आवश्यक आहे. शास्वत विकासासाठी ही प्रतिजैविक औषधे सुलभपणे प्रदान करणे आवश्यक आहे. 

काय उपाय करायला हवे? संसर्ग रोखण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय केल्यास खूप फरक पडू शकताे. या उपायांमध्ये हाताची स्वच्छता, आरोग्य सुविधांमधील उपकरणांची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, तसेच पिण्याचे सुरक्षित पाणी, प्रभावी स्वच्छता आणि बालरोग लसींचा मुबलक पुरवठा यांचा समावेश आहे, असे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी सांगितले आहे.

प्रभावी प्रतिजैविक औषधे आयुष्य वाढवतात, अपंगत्व कमी करतात, आरोग्य सेवा खर्च मर्यादित करतात. तसेच शस्त्रक्रिया सारख्या इतर जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय क्रिया सक्षम करतात, ओकेके म्हणाल्या.

आफ्रिकेतील कॉलराचे संकट गंभीर -लिलांडा (झांबिया) : आफ्रिका खंडाच्या दक्षिण आणि पूर्व भागातील अनेक देशांमध्ये उष्ण कटिबंधीय वादळ, पूर आणि दुष्काळ यामुळे मोठ्या प्रमाणावर या देशांमध्ये उपासमार आणि विस्थापन झालेले आहे. तसेच आणखी एक प्राणघातक धोका या देशांचा माग सोडण्यास तयार नाही, ते म्हणजे कॉलरा रोगाची आलेली भयानक साथ. - दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत, २०२१च्या उत्तरार्धात कॉलराच्या उद्रेकांची मालिका सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत आणि जवळजवळ कॉलराची ३,५०,००० हून अधिक प्रकरणे या देशांमध्ये नोंदवली गेली आहेत. - कॉलरा साथीच्या उद्रेकामध्ये मलावी, झांबिया, मोझांबिक, केनिया, इथिओपिया आणि सोमालियाचा समावेश आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHealthआरोग्यdoctorडॉक्टर