नवी दिल्ली - दिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करताना एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे हे विमान तात्काळ इंदूर येथील विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर या प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
इंडिगो एअरलाईन्सचे विमान आज दिल्लीतून पुण्याकडे निघाले होते. मात्र, विमानातील प्रवाशाच्या अचानक छातीत दुखू लागल्यामुळे विमान मध्येच इंदूर विमानतळावर उतरवले आणि प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, यापूर्वीही 24 जानेवारी 2018 रोजी जेट एअरवेजच्या दिल्लीतून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातही एका प्रवाशाला ह्रदयविकाराच झटका आला होता. त्यावेळीही विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. मात्र, योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे त्या प्रवाशाचा मृत्यू झाला होता.