नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाबाबतची भूमिका आज देशवासीयांसमोर मांडली. यावेळी मोदींनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. लहान मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले.
शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या परिषदेत नव्या शैक्षणिक धोरणावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, तीन चार वर्षे चाललेल्या वैचारिक मंथनानंतर नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. आज प्रत्येक विचारसरणीचे लोक यावर चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे या शैक्षणिक धोरणाला कुणीही विरोध केला नाही. कारण यात काहीही एकतर्फी नाही आहे. आता एवढ्या मोठ्या सुधारणेला वास्तवात कसे आणायचे याचा विचार सर्वजण करत आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जे काही करायचे आहे ते लवकरात लवकर केले जाईल. हे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी जी मदत हवी असेल ती केली जाईल. मी तुमच्यासोबत आहे. शैक्षणिक धोरणामध्ये देशाच्या लक्ष्यांना विचारात घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यातील पिढी तयार करता येईल. हे शैक्षणिक धोरण नव्या भारताची पायाभरणी करेल. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल