शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

... मग पुलवामा घडलंच कसं? मोदींविरुद्ध लढणाऱ्या तेज बहादूर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 3:25 PM

हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

वाराणसी - सैन्य दलातील दर्जाहीन जेवणावर आवाज उठवल्याने बडतर्फ केलेले बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकला आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे देशातील जवानांचे मॉरल डाऊन झाले आहे. विदेशातही सैन्याची बदनामी झालीय. म्हणूनच देशाच्या नकली चौकीदाराला हटविण्यासाठी मी वाराणसीतून निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले.  

हरयाणाचे रहिवासी असलेले तेज बहादूर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याच काम तेज बहादूर यांनी केलंय. देशाच्या काना-कोपऱ्यातून मला पाठींबा देण्यासाठी जवान येत आहेत. आता, संसदेतही देशाचे जवान जायलाच हवेत, असे म्हणत तेज बहादूर यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. पंतप्रधान मोदींच्या नावाची भीती अनेक देशांना बसलीय किंवा दहशतवाद्यांमध्ये मोदींचा दरारा आहे, याबाबत तेज बहादूर यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावरही तेज बहादूर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्रांमध्ये किंवा विदेशात मोदींची भीती असते, मोदींचा दरारा असता, तर पुलवामाचा हल्ला झालाच नसता. मोदींचा धाक बसला असता, तर पुलवामा हल्ला झालाच नसता.

जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांनीही पुलवामा हल्ल्यासंदर्भात चूक झाल्याचे मान्य केले. मग, या घटनेची चौकशी का होत नाही. अजित डोवाल हे मोदींचे खास आहेत, मग ते काय करत होते. तुम्हाला माहिती मिळाली होती, तरीही हा हल्ला झालाच कसा? असा प्रश्न तेज बहादूर यांनी विचारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे 7 व्या टप्प्यात 19 मे रोजी वाराणसी मतदारसंघात मतदान होत आहे. त्यासाठी तेज बहादूर यांनी चांगलीच तयारी केली आहे. आपल्या सैन्यातील मित्रांसमेवत ते वाराणसीत तळ ठोकून बसले आहेत. तसेच, वाराणसीतील सर्वसामान्य लोकांच्या भेटीगाठी देऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. सैन्य दलातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केल्याचे तेज बहाद्दूर यांनी सांगितले.

 दरम्यान, 2017 मध्ये तेज बहाद्दूर यादव यांनी बीएसएफमध्ये दर्जाहीन जेवण देत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर टाकत सैन्य दलातील भ्रष्टाचार उघड केला होता. यावेळी ते भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. मंडी मंदिर मुख्यालयातील 29 व्या बटालियनमध्ये ते कॉन्टेबल या पदावर होते. त्यांची नियुक्ती पूंछ जिल्ह्यातील खेत येथील एलओसीवर झाली होती. तेज बहादूर यांचे प्रकरण खूप गाजले होते. गेल्या वर्षी बीएसएफ जवान तेज बहाद्दूर यादव यांच्या व्हिडिओमुळे अधिकारी आणि सरकार संशयाच्या फेऱ्यात अडकलं होतं. बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आपला छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चौकशी केल्यानंतर, तेज बहादूर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीची आणखीही काही प्रकरणं समोर आली होती. बहादूर यांच्याकडे दोन मोबाईल बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच सैन्याच्या गणवेशात असताना सोशल मिडियावर फोटो टाकल्याने  सैन्याचे नियम तोडल्याचा आरोप ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाvaranasi-pcवाराणसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान