कुन्नूर - तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या अपघाताच्या ठिकाणी एका साक्षीदाराने जनरल बिपिन रावत यांना पाहिल्याचा दावा शिव कुमार यांनी केला. टेकड्यांमध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडल्यानंतर त्याने जनरल रावत यांना जिवंत पाहिले. शिव कुमार हा कंत्राटदार असलेल्या भावाला भेटायला गेला होता, तो चहाच्या मळ्यात काम करतो.
काल दुपारी निलगिरीतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. शिव कुमारचा दावा आहे की, त्यांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आगीत फुटताना आणि पडताना पाहिले. त्याने व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली.शिवकुमार यांनी एनडीटीव्हीला सांगितले, "आम्ही तीन मृतदेह पडलेले पाहिले... एक माणूस जिवंत होता. त्याने पाणी मागितले. आम्ही त्याला बेडशीटमध्ये गुंडाळून बाहेर काढले आणि नंतर त्यांना बचाव करणारे पथक घेऊन गेले," शिव कुमारने एनडीटीव्हीला सांगितले.शिव कुमार पुढे म्हणाला तीन तासांनंतर, कोणीतरी त्याला सांगितले की, तो ज्या माणसाशी बोलत होता ते जनरल बिपिन रावत होते आणि त्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा फोटो दाखवण्यात आला, त्यावेळी शिव कुमारला बिपीन रावत यांची ओळख पटली. "या माणसाने देशासाठी इतकं केलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता... आणि मी त्यांना पाणीही देऊ शकलो नाही. त्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही," असं शिव कुमार अश्रू ढाळत म्हणाला.कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दलाच्या तळावरून वेलिंग्टनला जात असताना हेलिकॉप्टर कोसळल्याने जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य ११ जण मृत्युमुखी पडले. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावलेले आहे, ज्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात गंभीर भाजल्यामुळे उपचार सुरू आहेत. राजनाथ सिंह यांच्या म्हणण्यानुसार ते लाइफ सपोर्टवर आहेत.Mi17 V5 हेलिकॉप्टरने बुधवारी सकाळी ११. ४८ वाजता सुलूर हवाई तळावरून उड्डाण केले आणि दुपारी 12:15 पर्यंत वेलिंग्टन येथे उतरणे अपेक्षित होते. मात्र दुपारी १२.०८ च्या सुमारास हेलिकॉप्टर रडारपासून दूर गेले. ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे आणि हेलिकॉप्टर का कोसळले हे समजण्यास तपासकर्त्यांना मदत होऊ शकते.