नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, अशा चिंताजनक वातावरणात लडाखमधील एक माता आपल्या नवजात अर्भकासाठी दररोज दिल्लीलादूध पाठवत आहेत. लेह येथून दिल्लीला येणाऱ्या विमानामधून हे दूध दिल्लीत आणले जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरू आहे.
या नवजात मुलाची आई लेहमध्ये उपचार घेत आहे. तर या अर्भकावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलासाठी लेह येथून पाठवले जात असलेले दूध वडील जिकमेट वांगडू हे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयापर्यंत पोहोचवत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १६ जून रोजी लेहमधील एका रुग्णालयात या बालकाचा जन्म झाला होता. दरम्यान, नवजात बालकाच्या अन्ननलिकेमध्ये काही गंभीर दोष असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या बाळाला अधिक उपचारांसाठी दिल्ली येथे घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
मात्र या मुलाच्या आईचे ऑपरेशन झाल्याने ती लेह येथील रुग्णालयात उपचार घेत होती. तसेच वडील म्हैसूर येथे असल्याने या बाळाचे मामा त्याला दिल्ली येथे घेऊन आले. पाठोपाठ बाळाचे वडीलही म्हैसूरहून दिल्लीत दाखल झाले. दरम्यान दिल्लीतील रुग्णालयात या बाळावर मोठी शस्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर बाळासाठी आईच्या दुधाची गरज होती. त्यानंतर विमानसेवेच्या माध्यमातून बाळासाठी लेह येथून दिल्लीमध्ये आईचे दूध आणण्याची व्यवस्था करण्यात आली. आता गेल्या महिनाभरापासून विमानाच्या माध्यमातून या बाळाला नियमितपणे आईचं दूध पाठवलं जात आहे.
लेह ते दिल्ली हे अंतर तब्बल एक हजार किलोमीटर एवढे आहे. मात्र डायरेक्ट विमान असेल तर लेह येथून दिल्लीला पोहोचण्यासाठी केवळ एका तासाचा वेळ लागलो. याबाबत बाळाचे वडील म्हणाले की, मी जेव्हा कर्नाटकमधून दिल्लीला आलो तेव्हा विमानातून आल्याने कोरोनाच्या भीतीमुळे माझ्या बाळाला हात लावायलासुद्धा घाबरलो. आता माझ्या बाळावर शालिमार बार परिसरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळाची आहार नळी श्वसननळीला जोडली गेली असल्याने तो काही खाऊ शकत नव्हता. नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच त्याला आईचे दूध देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र बाळाच्या आईवर लेह येथे शस्त्रक्रिया झालेली असल्याने तिला बाळासोबत येता आले नाही. त्यामुळे लेह येथून दररोज आईचं दूध पाठवण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी
गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…