नवी दिल्ली- रजनीकांत स्टारर चित्रपट काला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काला चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला असून, सद्या तरी चित्रपटाचा हा ट्रेलर तमीळ भाषेबरोबरच हिंदी भाषेतही लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये रजनीकांतला गरीब आणि झोपटपट्टीत राहणा-या लोकांचा मसिहा दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं सर्वाधिक चित्रीकरण हे मुंबईतल्या धारावी भागात झालं आहे.या चित्रपटात रजनीकांत गरिबांच्या हक्कांसाठी लढताना दाखवण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नवा वाद सुरू झाला आहे. कावेरी मुद्द्यावरून कर्नाटकातल्या चित्रपट वितरकांनी काला चित्रपट थिएटरमध्ये दाखवण्यास नकार दिला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. तसेच या चित्रपटात नाना पाटेकरांना अत्यंत क्रूर दाखवण्यात आलं आहे. जो माझ्या विरोधात असेल, तो मरणार, चित्रपटातला नाना पाटेकरांचा हाच डायलॉग हीट झालाय.दोन मिनिटांत या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत 43 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. चित्रपटातली रजनीकांतची एंट्री रोमांचक दाखवण्यात आली आहे. तसेच त्याचे डायलॉगही भारी आहेत. रजनीकांतचा 'काला' 7 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
...म्हणून रजनीकांतच्या 'काला' सिनेमावरून कर्नाटकात 'कल्ला'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 7:29 PM