... तर समाजवादी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा, युपीत प्रियंका गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:12 PM2022-01-22T18:12:18+5:302022-01-22T18:12:52+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक निकालानंतर आघाडीची शक्यता बोलून दाखवली. समाजवादी पक्षाला गरज असल्यास काँग्रेस आपला पाठिंबा देईल, असे प्रियंका गांधींनी जाहीर केले आहे

... So support for Samajwadi Party, Priyanka Gandhi's big announcement in UP | ... तर समाजवादी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा, युपीत प्रियंका गांधींची मोठी घोषणा

... तर समाजवादी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा, युपीत प्रियंका गांधींची मोठी घोषणा

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळ येत असताना चांगलेच राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. युपीत यंदा भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी यांच्यातच मुख्य लढत असल्याचे दिसून येते. या निवडणुकीत काँग्रेसची कमान प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, (UP Assembly Election) काँग्रेसला (Congress)मोठा धक्का बसला आहे. बरेली कँटमधील (Bareilly Cantt) काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया आरोन (Supriya Aron) यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, युपीतील राजकारणात पक्षप्रवेशाच्या मजेशीर घटना घडत आहेत. त्यातच, काँग्रेसने निकालानंतर सपाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलंय.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक निकालानंतर आघाडीची शक्यता बोलून दाखवली. समाजवादी पक्षाला गरज असल्यास काँग्रेस आपला पाठिंबा देईल, असे प्रियंका गांधींनी जाहीर केले आहे. अखिलेश यांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेस निश्चितच मदत करेल. मात्र, युवक आणि महिलांसाठी काँग्रेसने दिलेल्या अजेंड्यावर समाजवादी पक्षाने चालायला हवे, असेही गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष हा समाजवादी पक्षासोबतच्या आघाडीला मान्य करतो. कारण, ते विचारधारेच लढाई लढत आहेत. महिलांचे सशक्तीकरण करण्याची लढाई ते लढत आहेत, असेही प्रियंका यांनी सांगितले. 

सत्ता आल्यास 300 युनिट वीज मोफत

दरम्यान, अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी काही निर्णय घेतले आहेत. समाजवादी पार्टीने नवीन वर्षात उत्तर प्रदेशात सरकार आल्यास 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाणार आहे. मागील सरकारमध्येही आम्ही लॅपटॉपचे वाटप केले होते, प्रत्येक लॅपटॉपची स्वतःची कहानी आहे, ज्याला लॅपटॉप मिळाला त्याला खूप मदत मिळाली, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 2022 मध्ये सायकलच येणार. जर सरकार स्थापन झाले तर आम्ही 22 लाख नोकऱ्या आणि यूपीच्या तरुणांना फक्त आयटी क्षेत्रात रोजगार देऊ. आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. यूपीमध्ये आयटी हब बनवण्यात येणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 
 

Web Title: ... So support for Samajwadi Party, Priyanka Gandhi's big announcement in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.