नवी दिल्ली - नवा मोटार वाहन कायदा अस्तित्वात आल्यापासून नियमभंग केलेल्यांना ठोठावण्यात आलेल्या हजारो, लाखो रुपयांच्या दंडाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. पण नुकत्याच खरेदी केल्या गेलेल्या नव्याकोऱ्या स्कूटरवर त्याच्या किमतीपेक्षा अधिकचा दंड वाहतूक पोलिसांनी ठोठावल्याचे समोर आले आहे. ही घटना ओदिशामधील आहे. येथे एक नवीकोरी 65 हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी पोलिसांनी प्रथम जप्त केली. त्यानंतर मालकाशी केलेल्या चौकशीनंतप पोलिसांनी संबंधित दुचाकी विकणाऱ्या डिलरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्याचे झाले असे की, ही दुचाकी, भुवनेश्वर येथून 28 ऑगस्ट रोजी खरेदी करण्यात आली होती. 12 सप्टेंबर रोजी या स्कूटरला कटकमध्ये एका नियमित तपासणी नाक्यावर या स्कूटरला अडवण्यात आले. त्यावेळी केलेल्या तपासणीत स्कूटरवर तपासणी नंबर नसल्याचे समोर आले. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी गाडीवर रजिस्ट्रेशन प्लेट नसल्याचे सांगत आरटीओ अधिकाऱ्यांनी डीलरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच त्याचा डीलरशिप ट्रेड परवाना रद्द करण्याची सूचना केली गेली.
...म्हणून 65 हजारांच्या नव्याकोऱ्या स्कूटरवर ठोठावला लाखभराचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:40 IST