गुवाहाटी - राज्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे आपल्याला नवीन नाही. नदीवर पूल बांधून देण्याच्या सरकारने वारंवार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी स्वत:च नदीवर पूल बांधला. आसाम राज्यातील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील रहिवाशांनी कालाही नदीवर बांबूंच्या मदतीने हा पूल उभारला आहे.
येथील रहिवाशांना नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन सरकारकडून वारंवार देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेत बांबूंचा वापर करून नदीवर पूलाची बांधणी केली. "सरकारने आम्हाला नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पूल बांधला गेला नाही. आता या पुलाचा वापत शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे, असे एका ग्रामस्थाने सांगितले.