ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील भूमिपुत्रांसाठी अधिक संरक्षणवादी धोरणे आखताना दिसत आहेत. अमेरिकेने ‘एच-1बी’ व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्योजक सुनील भारती मित्तल यांना सांगितले की, भारतात "फेसुबक", "व्हॉट्सअॅप" आणि "गुगल"ला या अमेरिकी कंपन्यांवरही बंदी का आणली जाऊ नये?, असा प्रश्न उपस्थित करत मित्तल ट्रम्प यांच्यावर बरसले आहेत.
आमचा उद्योगधंदा पूर्णतः भारतीय बाजारपेठेवर आधारित असल्याच्या कारणाने अमेरिकेच्या स्वदेशीच्या धोरणाबाबत चिंता नसल्याचे, मित्तल यांनी यावेळी सांगितले. मात्र जेव्हा परदेशी कंपन्या भारतात मोठा नफा मिळवत असलीत तर भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून रोखणं पूर्णतः अयोग्य आहे, असे मत मित्तल यांनी मांडले.
गेल्या काही दिवसांत अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियानं देशातील व्हिसा नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीय आयटी कंपन्यांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पत्रकारांनी सुनील मित्तल यांना एअरटेल कंपनीला परदेशात प्रवेश दिला नाही तर आपली काय प्रतिक्रिया असेल असे विचारले असते त्यांनी असे रोखठोक उत्तर दिले.
भारतात गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या अॅपचे कोट्यवधी युझर्स आहेत. मात्र येथेही गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारखी अॅप्स आहेत, त्यामुळे या स्वदेसी अॅपचा वापर करायला हवा, असेही मित्तल यांनी म्हटले.