भुवनेश्वर : ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे पुजारी नरसिंह पूजापांडा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आपले जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे. चार महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेमंदिराची सेवा करणाऱ्यांचा वारसा हक्क रद्द करण्याची सूचना करतानाच, कोणत्याही भक्तावर त्याने देणगी द्यावी यासाठी सक्ती केली जाऊ नये, असा आदेश दिला होता.पुजारी पूजापांडा म्हणाले, मंदिराच्या आत भक्तांकडून येणाऱ्या भेटी आणि देणगी एवढेच माझ्या उत्पन्नाचे साधन आहे. आम्ही भक्तांकडे एक हजारपेक्षा जास्त वर्षांपासून देणगी मागतो. न्यायालय आणि सरकार आमचा हा उत्पन्नाचा एकमेव मार्ग बंद करू इच्छित आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या सेवेकऱ्यांना भक्तांकडून देणग्या स्वीकारण्यास मनाई केली असून, असे झाल्यास जगणे जवळपास अशक्य आहे. (वृत्तसंस्था)आत्मदहनाची धमकीमार्च महिन्यात पूजापांडा यांनी ‘रत्न भांडारात’ देशाच्या पुरातत्व खात्याच्या अधिकाºयांनी प्रवेश केल्याच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांचे सोने व इतर मौल्यवान वस्तू ठेवलेल्या रत्न भांडारची परिस्थिती बघण्यासाठी पुरातत्व विभागाने ओडिशा हायकोर्टाची परवानगी घेतलेली होती.
...म्हणून जगन्नाथ मंदिरातील 'त्या' पुजाऱ्याला हवंय इच्छामरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 5:35 AM