सुरेश भटेवरा नवी दिल्ली : ज्या सोशल मीडियावर तीन वर्षे अधिराज्य गाजवले, तेच व्यासपीठ आता भाजापासाठी चिंतेचा विषय बनले आहे. त्या माध्यमावरून भाजपावर टीकास्त्र सुरू झाल्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची पाळी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आली.पेट्रोल डिझेलच्या किमती अलीकडेच वाढल्या, तेव्हा मोदी, सुषमा स्वराज, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी आदी नेत्यांचे भाववाढीच्या विरोधातले जुने ट्विट्स व धरणे निदर्शनांची छायाचित्रे, त्यांच्या सध्याच्या निवेदनापेक्षाही अधिक शेअर केले गेले आणि रीट्विट होत आहेत. गुजरात विधानसभेच्या प्रचारात तर काँग्रेसने भाजपाच्याच जुन्या पोस्टर्सचा आधार घेत आपले प्रचार अभियान आखले आहे. याच मालिकेतले ‘विकास पागल हो गया है’ हे अभियान गुजरातामधे सध्या विशेष चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाला नेहमीच इतर पक्षांपेक्षा अधिक टीका सहन करावी लागते. भाजप त्यामुळेच सध्या अधिक चिंतेत आहे.आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय टोलेबाजीखेरीज, देशाच्या सुरक्षेसाठीही समाज माध्यमे सरकारच्या चिंतेचा विषय बनला आहे. गृहमंत्री राजनाथसिंगांनी सोशल मीडियावर राष्ट्रविरोधी कंटेटचे प्रमाण खूपच वाढले आहे, असे मत अलीकडेच व्यक्त केले.फेसबुक व व्टीटरवरील किमान ४00 कंटेट व १00 अकाउंट्स सरकारने बंद करण्यास भाग पाडले. काश्मीरमधे दहशतवादी गटांचे नेटवर्कच व्हॉटस अॅपवर चालते. सोशल मीडियावरील अफवांमुळे निर्माण होतो व तमाम दंगली त्यामुळेच भडकतात, असा सरकारी सूत्रांचा दावा आहे.>खरे तर नरेंद्र मोदींना २0१४ साली ऐतिहासिक विजय संपादनकरून देण्यात सोशल मीडियाच्या व्यासपीठाचाच सर्वात मोठा सहभाग होता. तेच माध्यम सध्या अनेक शंका व वादांचे केंद्र बनले आहे. या माध्यमाची विश्वासार्हता त्यामुळेच पणाला लागली आहे.>जुना खेळ आला अंगाशीसोशल मीडियावर २0१४ पर्यंत भाजपाचा बराच दबदबा होता. दिल्लीत केजरीवाल यांच्या ‘आप’ चा दरम्यान त्यात शिरकाव झाला. कालांतराने काँग्रेससह साºयाच प्रादेशिक पक्षांनी संघटितपणे या माध्यमाचा वापर सुरू केला. त्यामुळे भाजपापुढे मोठेच आव्हान उभे राहिले.
सोशल मीडियामुळे भाजपा बचावात्मक पवित्र्यात, टीकेमुळे सत्ताधा-यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 4:27 AM