नवी दिल्ली - देशात सुरू असलेल्या सोशल मिडिया कंपन्या अर्थात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने देशात काम करत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी तीन महिन्यांची वेळही दिली होती. ही वेळ आता 26 मेरोजी पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Social Media Guidelines will facebook instagram twitter and other social media platforms cease to operate in india from may 26)
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.
महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोशल मिडिया कंपन्यांना आपली वेबसाइट अथवा मोबाइल अॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल, असेही या आदेशात म्हणण्यात आले होते. आतापर्यंत केवळ कू नावाची कंपनी वगळता इतर कुठल्याही कंपनीने यांपैकी कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही.
भारतात काम करण्यासाठी अमेरिकेकडून हिरवा झेंडा... -सोशल मीडियावरील पीडित युझर्सना कुणाकडे तक्रार करावी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण कोठे होईल, यासंदर्भात माहिती नाही. काही प्लॅटफॉर्मने यासाठी सहा मिन्यांची मुदत मागीतली होती. काहींनी म्हटले आहे, की ते अमेरिकेतील त्यांच्या मुख्यालयाकडून आदेशाची वाट पाहत आहेत. या कंपन्या भारतात काम करत आहेत. भारतात पैसा कमवत आहे. मात्र, गाइडलाइन्सचे पालन करण्यासाठी मुख्य कार्यालयच्या हिरव्या झेंड्याची प्रतिक्षा करत आहे. ट्विटरसारख्या कंपन्या स्वतःचे फॅक्ट चेकर नियुक्त करतात. मात्र, त्या त्यांची ना ओळख सांगतात, ना कशा प्रकारे तथ्य शोधले जाते, हे सांगतात.
फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग
उद्यापासून लागू होणार नवे नियम -आयटी अॅक्टच्या कलम 79 नुसार, त्यांना मध्यस्थ म्हणून लाइबलिटीपासून सूट मिळालेली आहे. परंतु त्यांतील बऱ्याच कंपन्या सामग्रीवर निर्णय घेत आहेत. यांत भारतीय राज्यघटना आणि कायद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवे नियम 26 मे 2021 पासून लागू होत आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात.