युवा पिढी मधील वाढत्या आत्महत्या पाहता खरंच मरण एवढं स्वस्त झालं आहे का असा प्रश्न पडतो. टीव्ही अभिनेत्री तुनिशाचे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगढ येथील केवळ 22 वर्षांच्या युट्यूबरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 'लीना नागवंशी' असे तिचे नाव असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएनसर होती. घराच्या टेरेसवर तिचा मृतदेह आढळून आला.
लीना सोशल मीडिया इन्फ्लुएनसर होती. तिचे इन्स्टाग्रामवर 10 हजाराहून जास्त फॉलोअर्स होते. 2 दिवसांपूर्वीच तिने ख्रिसमसचे एक रील पोस्ट केले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, 26 डिसेंबर रोजी लीना नागवंशीने आत्महत्या केली. त्या दिवशी लीनाची आई बाहेर गेली होती. दुपारी घरी परतल्यानंतर लीना तिच्या खोलीत दिसली नाही. तिची आई गच्चीवर गेली असता दरवाजा बंद होता. बऱ्याच वेळाने दरवाजा तोडला असता लीना चा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सुसाईड नोट मिळलेली नाही. त्यामुळे लीना ने टोकाचे पाऊल का उचलले हे अस्पष्ट आहे. लीनाचे कोणासोबतही भांडण नव्हते. पोलीस सर्व दिशेने तपास करत आहेत.