कवी कुमार विश्वास यांनी रविवारी आपल्या खास व्यंगात्मक शैलीत एकाच बाणात दोन निशाणे साधले. कुमार विश्वास यांनी एका बातमीवर, आपल्या खास अंदाजात ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, हे समजणाऱ्यांना बरोबर समजले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने रविवारी, झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणावर, एक ट्विट केले आहे. यात, "आयएएस पूजा सिंघल प्रकरण. ईडीने रांची येथील झोनल ऑफिसमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी कोषाध्यक्ष रवि केजरीवाल यांची चौकशी केली, असे म्हणण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवत, झामुमोने केजरीवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
एएनआयच्या या ट्विटनंतर, कुमार विश्वास यांनी आपल्या सोईची एक खास गोष्ट पकडली आणि ती म्हणजे, केजरीवाल! कुमार विश्वास यांनी कुणाचेही नाव न लिहिता केवळ "एक और...?" असे ट्विट केले आहे. मग काय, कुमार विश्वास यांच्या ट्विटनंतर, कमेन्ट्सचा महापूरच आला.
एकाने लिहिले, सर या नावातच काही तरी गडबड आहे, जिथे असेल तिथे काही तरी गडबड होते. आणखी एका युजरने लिहिले, त्यांचे आडनाव केजरीवाल आहे, म्हणूनच आपण हसत आहात, हे खरे आहे ना? आणखी एका युजरने लिहिले, आपल्या देशात केजरीवालांची कमी नाही, आपल्या देशात केजरीवालजींचा जल्वा आहे.
यातच त्यांच्या विरोधातही काही लोक कमेन्ट करताना दिसत आहेत, एका युजरने लिहिले, जर तुम्हाला राज्यसभेची जागा दिली असती, तर सर्व काही ठीक ठाक राहीले असते ना?