मुंबई - सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं हा निकाल दिला आहे. सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यानं आरोपींना या प्रकरणातून मुक्त करण्यात येत असल्याचं न्यायालयानं म्हटले. साक्षीदारांनी आपला जबाब फिरवण्यावर तसंच जबाब न देण्यावर न्यायालयानं म्हटलं की, जर कोणीही जबाब देत नसेल तर यामध्ये पोलिसांचा दोष नाही.
न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की, साक्षीदार-पुराव्यांद्वारे हत्या आणि कट सिद्ध करण्यास परिस्थितीजन्य पुरावे देखील मिळालेले नव्हते. न्यायालयानुसार 'तुलसीराम प्रजापति यांची एका षड़यंत्रातून हत्या करण्यात आली, हादेखील आरोप योग्य नाहीय'. न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की, साक्षीदार-पुराव्यांद्वारे हत्या आणि कट सिद्ध करण्यास परिस्थितीजन्य पुरावे देखील मिळालेले नव्हते. न्यायालयानुसार 'तुलसीराम प्रजापतिचीही षड़यंत्रातून हत्या करण्यात आली, हादेखील आरोप योग्य नाहीय'.
नेमके काय आहे प्रकरण?गुजरात एटीएस आणि राजस्थान एसटीएफनं 26 नोव्हेंबर 2005 रोजी अहमदाबादजवळ एका चकमकीत सोहराबुद्दीन शेख आणि त्याच्या पत्नीला ठार केले होते. यानंतर एका वर्षानंतर 28 डिसेंबर 2006 रोजी या खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याची हत्या करण्यात आली. त्यालाही कथित चकमकीतच ठार करण्यात आल्याचा आरोप आहे. 2010 पासून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. 2012 मध्ये या प्रकरणाचा खटला मुंबई न्यायालयात वर्ग करण्यात आला. यानंतर खटल्याची निष्पक्ष सुनावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केले.
सरकारी वकिलांनी न्यायालयात 210 साक्षीदारांची साक्ष नोंदविली, त्यापैकी 92 साक्षीदार ‘फितूर’ जाहीर करण्यात आले.