शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

भारीच! गावात शेतीशिवाय कमाईची सुवर्णसंधी, 'या' योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार तब्बल 3.75 लाख 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:25 PM

Soil Health Card Scheme : आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. मोदी सरकारच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया... 

नवी दिल्ली - तुम्हाला शेती क्षेत्रात आवड असून आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. मात्र शेती करायची नाही तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे आपण केवळ व्यवसायच सुरू करू शकत नाही तर त्यातून चांगले पैसे देखील कमवू शकता. रोजगाराच्या शोधात असलेल्या खेड्यातील लोकांना या योजनेचा मोठा फायदा घेता येणार आहे. तसेच ज्यांना काही तरी वेगळं करायचं आहे. त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. मोदी सरकारच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया... 

काय आहे योजना?

केंद्र सरकारच्या या योजनेला सॉइल हेल्थ कार्ड स्कीम (Soil Health Card Scheme) असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर मिनी सॉइल टेस्टिंग लॅबची स्थापना केली जाईल आणि त्यानंतर या लॅबच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात. देशातील शेतकरी कुटुंबांच्या तुलनेत सध्या प्रयोगशाळा फारच कमी आहेत. त्यामुळे त्यात रोजगाराची मोठी संधी आहे. तसेच देशाला अशा प्रयोगशाळांची खूप आवश्यकता आहे.

नेमकं काम काय?

शेतातील मातीची यामध्ये चाचणी केली जाते. मातीची तपासणी करुन त्यात आढळणारे पोषक घटक शोधून काढले जातात आणि तपासणीनंतर त्यात सुधारणा करता येते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पानद वाढवण्यात खूप मदत होते. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी आणि सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून 300 रुपये प्रति नमुना इतके पैसे देण्यात येत आहेत. लागवडीच्या वेळी तुम्हाला किती खत द्यावे लागेल आणि सदर मातीत कोणते पीक घ्यायला हवं हे माती तपासल्यानंतर समजतं. याचबरोबरच खतांविषयी बरीच माहिती मिळते.

कोण सुरू करू शकतं ही लॅब?

या योजनेद्वारे 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण ही प्रयोगशाळा उघडू शकतात. यासह उमेदवाराला एग्री क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण, द्वितीय श्रेणीसह विज्ञान विषयात मॅट्रिक असणं आवश्यक आहे.

किती होतो खर्च?

साधारणपणे अशी कोणतीही लॅब स्थापित करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आपण या मृदा आरोग्य कार्ड योजनेचा (Soil Health Card Scheme) फायदा घेतल्यास, त्यातील 75 टक्के रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते. याचाच अर्थ सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातात. यानंतर तुम्हाला केवळ 1 लाख 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. तसेच यातून तुम्ही चांगली कमाईदेखील करू शकता.

कुठे संपर्क करायचा?

लॅब सुरू करण्याची इच्छा असलेले तरुण, उमेदवार, शेतकरी किंवा संस्था जिल्हा कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवू शकतात. यासाठी तुम्ही agricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या वेबसाईटचा वापर करू शकता. किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिक माहिती मिळू शकते. सरकार जे पैसे देईल त्यापैकी अडीच लाख रुपये प्रयोगशाळा चालविण्यासाठी टेस्ट मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. तसेच संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर एक लाख रुपये खर्च केले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीIndiaभारतbusinessव्यवसायMONEYपैसा