सोलापूर स्पेशल ड्राईव्ह बातमी : गणेशोत्सव 2015......
By admin | Published: September 05, 2015 1:37 AM
सोलापूर : बाप्पाच्या आगमनासाठी अवघे 11 दिवस उरले आहेत़ शहर व जिल्?ातील लहान मंडळांपासून ते मोठय़ा मंडळांपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या तयारीत मग्न आहेत़ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते दुकानदार, व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळींनी वर्गणी गोळा करण्याकडे कल वळविला आह़े वर्गणीची रक्कमही हक्काने मागितली जात आह़े अधिकाधिक वर्गणी गोळा करून दिमाखदार सजावट, मिरवणूक, आकर्षक देखावे सादर करण्याच्या कामांनी गती घेतली आह़े
सोलापूर : बाप्पाच्या आगमनासाठी अवघे 11 दिवस उरले आहेत़ शहर व जिल्?ातील लहान मंडळांपासून ते मोठय़ा मंडळांपर्यंत सगळेच जण बाप्पाच्या तयारीत मग्न आहेत़ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते दुकानदार, व्यावसायिक, राजकीय नेतेमंडळींनी वर्गणी गोळा करण्याकडे कल वळविला आह़े वर्गणीची रक्कमही हक्काने मागितली जात आह़े अधिकाधिक वर्गणी गोळा करून दिमाखदार सजावट, मिरवणूक, आकर्षक देखावे सादर करण्याच्या कामांनी गती घेतली आह़े सध्या शहरातील मोठय़ा मंडळांनी गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीचे काम सुरू केले आह़े शहरातील प्रमुख मंडळे हायकोर्टाच्या नियमाप्रमाणे व्यापक जागेवर आकर्षक पद्धतीने व रहदारीला अडथळा होणार नाही, याची खास दखल घेत मंडपाची उभारणी करीत आहेत़ याचवेळी गणपती बसविण्यासाठी असणारा स्टेज आकर्षक बनविण्यासाठी रंगरंगोटीच्या कामानींनीही वेग घेतला आह़े आकर्षक पडदे, झालर, झुंबर या सजावटीसाठी लागणार्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आह़े आपल्या पसंतीची मूर्ती खरेदीसाठी व ठरविण्यासाठी शहर व परिसरातील मंडळांनी कंबर तलाव परिसर, कन्ना चौक, अशोक चौक, जोडबसवण्णा चौक, रेल्वे स्टेशन परिसर, एसटी स्टँड, डफरीन चौक, जुळे सोलापूर, आसरा चौक, कोंतम चौक, बोरामणी नाका, राजेंद्र चौक आदी परिसरात गर्दी केली आह़े मूर्ती ठरवून अँडव्हान्स पैसे देऊन मंडळे आपल्या मंडळासाठी लागणारी मूर्ती बुकिंग करून ठेवीत आहेत़ इन्फो बॉक्स़़़़़़़़़़़़़़डॉल्बीमुक्त गणेशोत्सवशहर व ग्रामीण पोलीस यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना आवाहन करीत आहेत. डॉल्बी लावाल तर गुन्हे दाखल करू, असा इशाराही पोलिसांनी दिल्यामुळे गणेश मंडळे धास्तावली आहेत़ त्यामुळे गणेश मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांवर भर दिला आह़े झांज, बँजो, लेझीम, टिपरी, कवायतीसारखे खेळाचे प्रकार यंदा मिरवणुकीत दाखविण्यावर मंडळे भर देत आहेत़इन्फो बॉक्स़़़़़़़़़़़़़़मंडळांमध्ये चढाओढशहर पोलिसांनी आकर्षक मिरवणूक काढणार्या मंडळांना बक्षीस योजना जाहीर केली आह़े त्यामुळे आकर्षक देखावे सादर करून शिस्तप्रिय मिरवणूक काढण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आह़े आपल्या मंडळाचे वेगळेपण असावे, असा प्रयत्नही मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत़इन्फो बॉक्स़़़़़़़़़़वाहतूक पोलिसांचे नियोजनशहरात गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होत़े शहरातील मधला मारुती ते राजेंद्र चौक, भैय्या चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत या मार्गावरची वाहतूक गणेश चतुर्थीदिवशी तात्पुरती बंद करण्यात येत़े या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येत़े गणपती बसण्याच्या पहिल्या दिवशी बहुतांश मंडळे मिरवणूक काढतात़ हा मिरवणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलीस शर्थीचे प्रयत्न करतात़ वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची पूर्णपणे काळजी वाहतूक पोलीस घेत आहेत़ तसे नियोजनही वाहतुूक पोलीस अधिकारी करीत असल्याचे सांगण्यात आल़ेइन्फो बॉक्स़़़़़़़़़़मूर्तीवर शेवटचा हातजसजसा गणेशोत्सव जवळ येत आहे तसतसे गणेशोत्सवाच्या तयारीनेही वेग घेतला आह़े शहरातील मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवितानाचे चित्र आह़े यंदा 1 फुटापासून 25 फुटांपर्यंत विविध वेशात, कलेत, आकर्षक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत़ 50 रुपयांपासून दीड लाखापर्यंतच्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत़ यंदाच्या वर्षी बाहुबली, जय मल्हार, कृष्णाच्या रूपातील, छत्रपती शिवाजी महाराज, शंकराच्या विविध रूपातील गणेशमूर्ती खरेदीकडे मंडळांचा कल आह़े इन्फो बॉक्स़़़़़़़़़़शहरातील 40 टक्के मूर्ती परराज्यातशहरातील 70 मूर्तिकारांनी 5 लाखांहून अधिक गणेशमूर्ती बनविल्या आहेत़ यापैकी 40 टक्के मूर्ती या आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलगंणा आदी राज्यांत विक्रीसाठी जात आहेत़ गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी गणेश मंडळे कंटेनर, रेल्वे, ट्रक आदींचा आधार घेत आहेत़ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मूर्ती घेऊन जात असताना गणेश मंडळांचे पदाधिकारी अधिक काळजी घेत आहेत़ कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी दक्षता घेत आहेत़इन्फो बॉक्स़़़़़़़़़़़़शांतता कमिटीच्या बैठकांना गतीयंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आह़े मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाचे पदाधिकारी यांच्यात संयुक्त शांतता कमिटीची बैठक घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, एक गाव एक गणपती, इकोफ्रेंडली गणपती यावर भर देण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकीतून सूचना व आदेश देण्यात येत आहेत़ त्याचप्रमाणे हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, असेही आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आह़े इन्फो बॉक्स़़़़़़़़़़़दुष्काळग्रस्तांसाठी हवी मदतमागील तीन महिन्यांपासून शहर व जिल्?ात पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे जिल्?ात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आह़े अशातच शासनाकडून कोणतीच मदत होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आह़े अशातच गणेश मंडळांनी शेतकर्यांना आधार देण्याची खरी गरज निर्माण झाली आह़े त्यामुळे उत्सवावर अवाढव्य खर्च न करता थेट दुष्काळग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन जाणकारांतून व्यक्त होत आह़ेइन्फो बॉक्स़़़़़़़़़़़़़पौराणिक देखाव्यांवर हवा भरगणेशोत्सव साजरा करताना अनेक मंडळे देखावे सादर करतात़ मात्र यंदाच्या वर्षी गणेश मंडळांनी अवाढव्य खर्च न करता पौराणिक देखाव्यावर भर देऊन समाज जागृती करण्याची गरज निर्माण झाली आह़े पौराणिक देखाव्यांतून मंडळांनी आपली संस्कृती अधिक द्विगुणित करण्याचा प्रयत्न करावा़ रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू न ठेवता पोलिसांच्या सूचनेप्रमाणे कमी कालावधीत जास्तीचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मंडळांनी करावा़