सूर्यग्रहणावेळी पृथ्वीवर येणाऱ्या हानीकारक किरणांमुळे असे म्हटले जाते की वातावरण दुषित होते. यामुळे ग्रहणानंतर साफसाफाई करणे खूप गरजेचे मानले जाते. शास्त्रांमध्ये ग्रहणानंतर घरातील शुद्धीचे उपाय सांगितले गेले आहेत. ग्रहण लागताच पूजापाठ आणि धार्मिक कार्ये बंद केली जातात. यामुळे देशभरातील मोठमोठी मंदिरांचे दरवाजे आज बंद करण्यात आले होते.
या मंदिरांमध्ये ग्रहण संपल्यानंतर पुन्हा पूजापाठ करून उघडले जाते. अशाच प्रकारे आपण राहत असलेल्या घराचीही शुद्धी करावी लागते. ग्रहण संपल्य़ावर घरामध्ये गंगाजल शिंपडावे. गंगाजलामध्ये कापूर मिसळून शिंपडल्यास घरातील वास्तूदोष दूर होतात. तसेच ग्रहणाच्या दुष्प्रभावातूनही मुक्ती मिळते. घरातील नकारात्मक उर्जाही निघून जाते.
सूर्य ग्रहणानंतर घराला पूर्ण शुद्ध करण्यासाठी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये लिंबू आणि जाडे मीठ मिसळावे. हा उपाय ग्रहणावेळी निर्माण झालेली अशुद्धी काढण्यासाठी प्रभावी आहे. फरशी पुसल्यानंतर घरातील वातावरणामध्ये सुगंधीत आणि शांतता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अगरबत्ती लावू शकता.
ग्रहणानंतर गायीपासून मिळणारे पाच पदार्थ घ्यावेत. यामध्ये दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण येते. या पाचही पदार्थांना समान प्रमाणात एकत्र करावे. हे मिश्रण एका उघड्या भांड्यामध्ये उघड्या ठिकाणी ठेवावे. याशिवाय हे मिश्रण घरातील काही ठिकाणी, लॉनमध्ये शिंपडू शकता. हे मिश्रण ग्रहणावेळी उत्पन्न झालेली नकारात्मक उर्जा संपविते.
सूर्य ग्रहणानंतर संध्याकाळी घरामध्ये चमेलीच्या तेलाने दिवा पेटवावा. याशिवाय धुप जाळून त्याचा धूर घरामध्ये पसरवावा. असे केल्याने घरातील अशुभ प्रभाव दूर होतील.
ग्रहणानंतर काय कराल?ग्रहण काळातले शिळे अन्न टाळावे. अंघोळ करून देवपूजा करावी. दान करून भोजन करावे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर
Solar Eclipse 2020 : दुर्लभ योग! सूर्याने रंग बदलले; पहा सूर्यग्रहणाची टिपलेली छायाचित्रे
CoronaVirus देशाला कोरोनाचे ग्रहण! रुग्णांचा आकडा 4 लाख पार; मृत्यूचा उच्चांक
२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार
Solar Eclipse 2020 : थोड्याच वेळात यंदाचे सर्वांत मोठे सूर्यग्रहण; 'इथे' LIVE पाहता येणार