नवी दिल्ली - देशात रविवारी (21 जून) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतील काही प्रदेशांतून दिसणार असून, उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो.
कंकणाकृती अवस्था पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड येथून सुमारे एक मिनिट दिसणार असून, उर्वरित भारतातून ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. सूर्यग्रहण थेट पाहू नये. पाहिल्यास डोळ्यास इजा होते. ग्रहण विशेष चष्म्यातूनच पाहावे. घरबसल्या टीव्हीमध्ये पाहून देखील ग्रहणाचे निरीक्षण करू शकते. सूर्यग्रहण पाहताना काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.
- सूर्यग्रहण पाहत असताना ते उघड्या डोळ्यांनी पाहू नका.
- ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे तयार करण्यात आले आहेत ते घालूनच ग्रहण पाहावे. जेणेकरून डोळ्यांना इजा होणार नाही.
- फॅब्रिकेशनच्या दुकानातील आर्क वेल्डर वस्तू वेल्डिंग करताना एक विशिष्ट डार्क फिल्टर वापरतात. या फिल्टरचा उपयोग थेट सूर्याकडे पाहण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
- पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.
- होममेड फिल्टर्स म्हणजेच घरातील साध्या चष्म्याचा वापर सूर्यग्रहण पाहण्यासाठी करू नका.
- सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्पेशल सोलार फिल्टरर्सचा वापर करा.
- सोलार फिल्टर वापरण्याच्या आधी तपासून पाहा जर त्यावर स्क्रॅच असेल तर त्यांचा वापर करू नका. फिल्टरवर नमुद करण्यात आलेल्या गोष्टी आधी वाचा.
- पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पाहू सूर्यग्रहण पाहू नका. ते डोळयांसाठी त्रासदायक ठरू शकते.
- एक्सरे अथवा इतर गोष्टींचा वापर करून सुर्यग्रहण पाहू नका.
- लहान मुलांना ग्रहण दाखवत असाल तर विशेष काळजी घ्या.
महत्त्वाच्या बातम्या
इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार
"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"
वरात, विधीसह रंगला विवाहसोहळा पण लग्नात नवरी ऐवजी होता पुतळा... एका लग्नाची गोष्ट
Flipkart Big Saving Days : खूशखबर! फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल, स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर सूट
खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल