नवी दिल्ली : आज 2020मधील पहिले सूर्यग्रहण दिसले. या खगोलीय घटनेसंदर्भात ज्योतिष तज्ज्ञांचे आकलन फारसे चांगले संकेत देत नाही. ज्योतिषांचे म्हणणे आहे, की ग्रहांचा असा संयोग 1962मध्ये झाला होता. जेव्हा एका पाठोपाठ एक असे तीन ग्रहण लागले होते. काहीसे असेच यावेळीही होत आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही. ज्योतिष तज्ज्ञांनी म्हटले आहे, की ग्रह-नक्षत्रांच्या अशा संयोगामुळे जगात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती यईल आणि ती संपूर्ण जगात थैमान घालू शकते.
PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा
सूर्यग्रहणादरम्यान ग्रहांचा संयोग विनाशकारी -ज्योतीष पंडित प्रतीक भट्ट यांच्या मते, ग्रह नक्षत्रांची एकूण स्थिती अत्यंत भयावह आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात ग्रहांचा संयोग अत्यंत विनाशकारी आहे. यांच्या प्रभावामुळे नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सैन्यांतील झटापट अथवा युद्धही होऊ शकते.
गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले
ज्योतिषशास्त्राचे म्हणणे आहे, की 1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. अत्ताच 5 जूनला चंद्र ग्रहण झाले. दुसरे सूर्यग्रहण आज आहे. यानंतर आता जुलैमध्येही एक ग्रहण आहे. यापूर्व 1962मध्येदेखील असाच योग तयार झाला होता आणि सलग तीन ग्रहण झाले होते. 58 वर्षांपूर्वी 17 जुलै 1962 रोजी चंद्रग्रहण, 31 जुलैला सूर्य ग्रहण आणि 15 ऑगस्टला दुसऱ्यांदा चंद्रग्रहण लागले होते.
भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट
आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिषाचार्य प्रतीक भट्ट यांनी दावा केला, की 7 जुलैपूर्वी भारत चीनविरोधात मोठे पाऊल उचलेल आणि इतर काही देशही भारताच्या बाजूने उभे राहतील. मोठे युद्ध होईल असे वाटत नाही. मात्र छोटे युद्ध अथवा हिंसक झटापट होण्याची पूर्ण शक्यता आहे.