शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
3
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
5
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
6
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
7
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
8
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
9
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
10
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
11
बलात्कारानंतर शरीरावर ठोकले खिळे, नंतर जिवंत जाळले, मणिपूरमध्ये ३ मुलांच्या आईसोबत क्रौर्य
12
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...
13
यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, 'वेदविद'चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली...
14
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
15
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
16
Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेला 'या' वेळेतच कार्तिकेयाचे दर्शन घ्या; आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा!
17
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
18
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
19
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
20
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना

जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 6:02 PM

एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला.

मनोज कुमार राय यांची प्रेरणादायी कथा त्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे जे कठीण परिस्थितीतही आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करतात. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला. या संघर्षानंतरही मनोज यांनी हार मानली नाही आणि आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं.

१९९६ मध्ये, मनोज आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी भाज्या विकल्या तसेच अनेक कार्यालयांमध्ये क्लिनर म्हणून काम केलं. एके दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सामान पोहोचवत असताना त्यांना काही विद्यार्थी भेटले. या विद्यार्थ्यांनी मनोज यांना यूपीएससी परीक्षेबद्दल सांगितलं आणि त्याचवेळी मनोज यांनी ठरवलं की, त्यांनाही आयएएस होऊन आपल्या कुटुंबाची आणि गावाची गरिबी संपवायची आहे. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मनोज यांनी दिल्लीच्या अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बीएचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी ते अजूनही भाजीपाला विकत राहिले. २००० मध्ये त्यांनी बीएची पदवी पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी तीन वर्षे अहोरात्र मेहनत केली. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाने त्यांना अधिक मजबूत केलं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं.

यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत तीन वेळा नापास होऊनही मनोज यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी आपली रणनीती सुधारली आणि पूर्ण प्रामाणिकपणे तयारी सुरू ठेवली. २०१० मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना ८७० वा रँक मिळाला आणि आयएएस होण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं. अथक परिश्रम, संयम आणि जिद्द हेच त्यांच्या यशामागचं कारण होतं. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी