शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

...तर जवानांना स्वखर्चाने खरेदी करावा लागेल गणवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 2:40 PM

केंद्र सरकारने दारुगोळा खरेदीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध न केल्याने लष्कराला हे पाऊल उचलावे लागले आहे.

नवी दिल्ली -  भारतीय लष्कराने सरकारी शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांमधून (ऑर्डनन्स  फॅक्टरी) होणाऱ्या आपल्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये आवश्यक दारुगोळा तातडीने खरेदी करण्यासाठी पैसे साठवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  एका अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे लष्कर ऑर्डनन्स  फॅक्टरीमधून पुरवठा होणाऱ्या उत्पादनांचे प्रमाण 94 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यत कमी करणार आहे. केंद्र सरकारने दारुगोळा खरेदीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध न केल्याने लष्कराला हे पाऊल उचलावे लागले आहे. दरम्यान, लष्कराच्या या निर्णयामुळे जवानांना मिळणाऱ्या गणवेशाच्या साहित्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सैनिकांना आपला गणवेश आणि अन्य साहित्य खुल्या बाजारातून खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच काही वाहनांच्या सुट्या भागांची खरेदी करणेही या निर्णयामुळे कठीण होणार आहे. लष्कर आपातकालीन दारुगोळ्याचा साठा करण्यासाठी तीन योजनांवर काम करत आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्करावर ही वेळ आली आहे. अशा परिस्थितीत लष्कराकडून आपल्या किमान खर्चामध्येच आपातकालीन दारुगोळा खरेदीची व्यवस्था करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. 2018-19 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराकडे ऑर्डनन्स फॅक्टरीमधून होणाऱ्या पुरवठ्यामध्ये कपात करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. दरम्यान लष्कर ज्या तीन प्रकल्पांवर काम करत आहे. त्यापैकी केवळ एकच सुरू झाला आहे.  गेल्या काही वर्षात निधीच्या कमतरतेमुळे लष्कराच्या आपातकालीन प्रकल्पांना फटका बसला आहे.    

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतGovernmentसरकार