शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार

By बाळकृष्ण परब | Published: October 06, 2020 10:39 PM

Indian army News : आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.

ठळक मुद्देअमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या  करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेतलष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे

नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लडाखमधील एलएसीवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या चीनसमोर भारताने आपले लष्कर उभे केले आहे. दरम्यान आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या  करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे.

भारताने फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत या रायफल्स खरेदी केल्या होत्या. नव्या रायफल्सना सध्याच्या भारतीय स्मॉल आर्म्स सिस्टिम रायफलमधून बदलण्यात येईल. या रायफल्सचा वापर सध्या भारतीय सुरक्षा बलांकडून करण्यात येत आहे.आखलेल्या योजनेनुसार सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी अभियानांसाठी आणि एलओसीवर तैनात जवान आयात करण्यात आलेल्या सुमारे दीड लाख रायफल्सचा वापर करणार आहेत. तर इतर सुरक्षा दलांना एके-२०३ रायफल्स देण्यात येतील. या रायफल्सची निर्मिती रशिया आणि भारत यांनी अमेठी येथे संयुक्तपणे उभारलेल्या अमेठी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाने लाइट मशीन गनची मागणी पूर्ण करण्यासाठी इस्राइलला १६ हजार एलएमजीची ऑर्डर दिली आहे.भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव आहे. भारताने चीनच्या सीमेवरील आक्रमणाला अत्यंत आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले आहे. विशेषकरून गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्यानंतर भारताकडून अधिकच आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाख