ाासाठी उद्योगमंत्र्यांना साकडे(जोड)माळेगाव औद्योगिक वसाहतीतून सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीला प्रतिदिन एक हजार ५०० घनमीटर पाणी मंजूर आहे. तथापि, संस्थेत झालेल्या उद्योगांच्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढली असून, संस्थेला दोन हजार ५०० घनमीटर पाणी घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. संस्थेची जिरायत झोनमधील (गट क्रमांक १००५/ अ-१) क्षेत्र ६ हेक्टर १६ आर हे क्षेत्र औद्योगिक वापरासाठी बदल करून मिळण्याचा प्रस्ताव वर्षानुवर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी सहकार्य करावे, असे साकडे त्यांना घालण्यात आले. मराठवाडा आणि विदर्भात उद्योगांचा विजेच्या दराच्या सुसूत्रीकरणाबाबत घेतलेला निर्णय उत्तर महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. नाशिक-सिन्नर महामार्गाच्या मंद गतीने सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामास वेग देण्यात यावा, सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे सिन्नर ते खोपडीपर्यंत दुभाजकासह सहापदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार वाजे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष चव्हाणके व आवारे यांनी मांडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उद्योगमंत्री देसाई यांनी शिष्टमंडळास दिले. (वार्ताहर)फोटो क्रमांक - 08२्रल्लस्रँ05फोटो ओळी- सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा करताना आमदार राजाभाऊ वाजे, अरुण चव्हाणके, नामकर्ण आवारे, विजय जाधव आदि.
औद्योगिक वसाहतीचे प्रश्न सोडविण्य्
By admin | Published: January 08, 2016 11:20 PM