शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

'आणखी काही पक्षही सोडतील, कारण 'दलदलीत'...; ममता यांच्या 'ना' नंतर काँग्रेस नेत्याची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 3:40 PM

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता, आणखी काही पक्ष 'दल-दली'तून बाहेर पडू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 'एकला चलोरे'ची भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत जागावाटपावर एकमत न झाल्याने तृणमूल काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता, आणखी काही पक्ष 'दल-दली'तून बाहेर पडू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे. 

आचार्य प्रमोद हे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. ते म्हणाले, 'आता काही आणखी पक्षही सोडतील, 'दल-दल'मध्ये कुणीही फसू इच्छित नाही.'

नुकतेच, त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचे श्रेयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले होते, 'हा सनातनचे शासन आणि 'राम राज्या'च्या पुनर्स्थापनेचा दिवस आहे. शेकडो वर्षांचा संघर्ष आणि हजारो लोकांच्या बलिदानानंतर हा क्षण आला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर हे शक्य झाले नसते, असे मला वाटते.'

आप सर्व १३ जागा जिंकेल - मानममता यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. आप पंजाबच्या सर्व १३ जागांवर निवडणूक जिंकेल असे वक्तव्य मान यांनी केले आहे. मात्र, याचबरोबर आपण ममता बॅनर्जी यांच्या मार्गावर जाणार नाही असेही मान यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwest bengalपश्चिम बंगाल