ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 26- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहारनपूरमध्ये रॅलीला सुरुवात झाली आहे. भाजपाला केंद्रात सत्तेत येऊन दोन वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीला मोदीचं भाषण ऐकण्यासाठी मोठा जनक्षोभ उसळला आहे. यावेळी मोदींनी भाषणात काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. देश बदलतोय मात्र काही लोकांची डोकी ठिकाणावर येत नाही आहेत. तसेच राज्यांना ताकदवान बनवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती यावेळी मोदींनी दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीतल्या जनतेपुढे दोन वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. दोन वर्षांत मी एक रुपया खाल्ल्याची बातमी ऐकली आहे का ?, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
-दोन वर्षांत गरिबांच्या हिताचे निर्णय घेतले
-सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर
-प्रधानसेवक ही माझी जबाबदारी
-सरकारं येतात आणि जातात, निवडणुका होतच असतात
-माझ्या सरकारनं गरिबांना गरिबीच्या विरोधात लढण्याची ताकद दिली
-देश बदलतोय मात्र काही लोकांची डोकी ठिकाणावर येत नाहीत
-ऊस शेतक-यांसाठी योजना बनवली
-ग्रामपंचायतींना 2 लाख कोटी देण्यासाठी योजना केल्या
-2022 पर्यंत ऊस उत्पादकांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य
- डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय आता 65 वर्षं
-3 कोटी कुटुंबांना सव्वा लाख कोटी गॅरंटीशिवाय कर्ज दिलं
-गावागावात वीज पोहोचवण्याचा विडा उचलला आहे
- भारतात दुपटीनं रस्ते तयार करण्यात आलेत
-महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारनं मोठं काम केलं
-पहिल्यांदाच पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली
-येत्या 3 वर्षांत 5 कोटी गरीब जनतेला मोफत घरगुती गॅस कनेक्शन देणार
-दोन वर्षांत मी एक रुपया खाल्ल्याची बातमी ऐकली आहे का ?
-मी सरकारी लूट थांबवण्याचा विडा उचलला आहे
-2022 पर्यंत ऊस उत्पादकांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य