नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि भारतील परिस्थितीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बंगालमध्ये काही लोक भारत आणि बंगाल असे युद्ध छेडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.
यासोबतच देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर जोपर्यंत कोरोनावर औषध सापडत नाही तोपर्यंत कोरोनाला सोबत घेऊनच रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
पश्चिम बंगालच्या काही लोकांनी भारत आणि बंगालदरम्यान युद्ध घडवण्याची निवड केली आहे. आम्हाला युद्धामध्ये कोणतेही स्वारस्य नाहीय. आम्हाला समस्या सोडविण्यामध्ये स्वारस्य आहे. आम्ही प्रत्येक राज्याची मदत करू इच्छित आहोत, असा आरोप जावडेकर यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता केला आहे.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारकी कोरोना पाहणी टीम बंगालला जाणार होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यांना नकार देत राज्यात प्रवेश दिला नव्हता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींनंतर बोलायला दिले नसल्याचा आरोप केला होता.
कोरोनासोबत जगावे लागणार...जावडेकर यांनी सांगितले की, अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. जोपर्यंत औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सहा फूट दूर राहणे हे आता सामान्य झाले आहे. कारण लोकांनी गेल्या ४० दिवसांत ते आत्मसात केले आहे, असेही जावडेकर म्हणाले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...